GM NEWS, कृषी वृत्त : आधुनिकतेची कास धरा, शेतीला बलशाली करा ! जामनेर तालुका कृषी विभागाने बांधावर जाऊन दिला शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचा मंत्र .

0
342

तळेगाव,ता. जामनेर,दि .६ (डॉ.गजानन जाधव ) : – महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून आयोजित कृषी संजीवनी सप्ताह आज फत्तेपुर मंडळाअंतर्गत मादणी ता. जामनेर येथे सुरक्षित अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून पार पडला.
वर्षानुवर्षे आपण एकच पीक व एकच पीक पद्धतीची निवड करत आहोत तरीही आपल्याला त्यातून हवे तसे उत्पन्न मिळत नाही परिणामी शेतकरी आर्थिक संकटात आहे त्यामुळे आधुनिक दृष्टिकोन ठेऊन शेती करावी असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी अशोक वाळके यांनी मादनी येथे केले.
कृषी सहायक नामदेव पाटील व ग्रामपंचायत मादणी यांच्या साहायाने आज कृषी संजीवनी सप्ताह पार पडला
यावेळी प्रमुख मार्गदर्शक सुरेश लोहार यांनी माती नमुना तपासणीचे महत्व व खतांवर होणारा अवाजवी खर्च कसा कमी करता येईल व उत्पादन कसे वाढेल तसेच कामगंध सापळे शेतात लावण्याचे फायदे, कार्यपद्धती याचे सविस्तर मार्गदर्शन केले.
शेतकरी बांधवांनी पारंपारिकतेला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञान कसे शेतीस साहाय्यभूत ठरते, कापूस पिकावरील कीड व रोग नियंत्रण याचे विस्तृत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक मार्गदर्शक सुनील गायकवाड यांनी केले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना व शासन राबवित असणाऱ्या विविध शेतकऱ्याला संजीवनी देणाऱ्या योजनांची माहिती कृषी सहायक श्री नामदेव पाटील यांनी शेतकऱ्यांना दिली. शेवटी शेतकरी बंधूंच्या कापूस पिकासंबंधी शंकांचे समाधान करण्यात आले व कार्यक्रम समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. शेतकाऱ्यांनी आपल्या कापूस पिकसंबंधी समस्या व उपाययोजना यासंबंधी कृषी संजीवनी साप्ताहाद्वारे सोडवुन घ्याव्यात असे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रसंगी मादणीचे प्रगतशील शेतकरी व शेतकी संघ संचालक शिवाजी पाटील, सरपंच सुशील पाटील तसेच गावातील इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.