GM NEWS: चिंताजनक वृत्त : जामनेर तालुक्यातील पहूर परीसरातील अजून १८ जण कोरोना पॉझीटीव्ह . पहुर येथील १० तर लोंढरी तांडा येथेही ८ जणांना कोरोनाची बाधा . काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन .

0
1309

पहूर, ता .जामनेर दि . ( शंकर भामेरे ) जामनेर तालुक्यातील पहूर येथे आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार १० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर लोंढरी तांडा येथेही ८ जण बाधित आढळले आहेत .
वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप पाटील यांनी ही माहिती दिली .नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .पहूर येथील बाधितांची संख्या आता ३५ वर पोहोचली असल्याने जामनेर तालुक्यात
नाचणखेडा नंतर पहूर हॉटस्पॉट ठरले आहे .गावकऱ्यांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे .

प्रशासनाने आता तरी पत्रकार बांधवांनी मागणी केलेल्या ५ दिवस पहुर बंदच्या निर्णयावर विचार करावा नव्हे तर पहुर ५ दिवस कडकडीत बंद ठेवावे ही मागणी पुनश्च पहुर येथील पत्रकार बांधवांनी केली आहे .