*GM NEWS, कृषी वृत्त :* *कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतक-यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे* *- जळगांव जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड*

0
758

जळगाव,दि.10 (मिलींद लोखंडे ):- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत ऑनलाईन पोर्टलवर पात्र शेतक-यांच्या याद्या प्रसिध्द झालेल्या आहेत. त्यानुसार CSC सेंटर व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिध्द झालेल्या यादीतील शेतक-यांनी त्यांचे आधार प्रमाणीकरण करुन घेवुन योजनेचा लाभ घेत आहेत.

परंतु ज्या शेतक-यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घेतले नाही, अशा शेतक-यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांचे नजिकच्या CSC सेंटरवर किंवा त्यांचे संबधीत बँक शाखेस तात्काळ संपर्क करुन त्यांचे आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. म्हणजे प्रसिध्द झालेल्या यादीतील सर्व शेतक-यांना संबंधीत बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरीत लाभ देण्याची कार्यवाही करुन सदर योजना पुर्ण केली जाईल व पुढील विस्तारीत कर्जमुक्ती योजना सुरु करण्यास अधिक विलंब होणार नाही.

तसेच सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020-21 या हंगामामध्ये पीक कर्ज घेण्यासही पात्र ठरणार आहेत. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगांव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे