GM NEWS : दबंग कारवाई वृत्त : पहूर येथे जनता कर्फ्यू दरम्यान तोंडाला मास्क न बांधता विनाकारण बाहेर फिरणाऱ्या १६ जणांवर कारवाई . २०० रुपये प्रमाणे ३२०० रुपये दंडाची केली वसूली . अन्य दोघांवर १८८ कलमान्वये कारवाई . पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांची धडक कारवाई .

0
820

पहूर , ता . जामनेर दि. ११ ( शंकर भामेरे ) –

जामनेर तालुक्यातील पहूर येथे लागू करण्यात आलेल्या पाच दिवशीय जनता कर्फ्यूच्या आजच्या पहिल्याच दिवशी पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी तोंडाला मास्क न लावता आवारा फिरणार्‍या १६ जणांवर कारवाई करत प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ३ हजार २०० रुपये दंड वसूल केला . तसेच अन्य दोघांवर १८८ कलमान्वये कारवाई केली .
पहूर येथे कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी covid-19 प्रतिबंध समिती, व्यापारी असोसिएशन , पत्रकार संघटना , प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला . हॉटस्पॉट ठरलेल्या पहूरला बाधितांच्या संख्येची अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे . कोरोना संक्रमणाची सामाजिक साखळी खंडित करण्यासाठी ११ ते १५जुलैदरम्यान पाच दिवसांचा कडकडीत बंद पाळला जाणार असून आज पहिल्या दिवशी गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस राकेश सिंह परदेशी ,पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे . विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे विनाकरण फिरणाऱ्यांवर वचक बसला आहे .

कारवाई सुरूच राहणार –
उद्या बंदचा दुसरा दिवस असून रविवारी बाजाराच्या निमित्ताने गावातील तसेच खेड्यापाड्यावरील लोक पहूर येथे येण्याची शक्यता ओळखून बदोबस्त आणखी कडक केला जाणार असून कारवाई सुरूच राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी सांगीतले .