GM NEWS , गुन्हे वार्ता : जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो.येथे दुहेरी हत्याकांड . मोठ्या मुलाने केली जन्मदात्या पित्याची व लहान भावाची धारदार चाकूचे सपासप वार करून निर्घुण हत्या . अंगाचा थरकाप उडविणारी रात्रीची घटना ! फॉरेन्सीक पथकासह अधिकारी घटनास्थळी दाखल . आरोपी पोलीसांच्या ताब्यात,गुन्हा दाखल .

0
1940

( प्रतिनिधी,पहूर , ता . जामनेर – शंकर भामेरे ,
प्रतिनिधी,लोहारा, ता. पाचोरा – चंद्रकात पाटील ) : –

दि.१२ जुलै –
पहूर पोलीस ठाण्यांतर्गत पहूर येथून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावरील नांद्रा प्र . लो . येथे जन्मदात्या बापाची व लहान भावाची पोटच्या मुलाने धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना शनिवारी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास घडली . घटनेची माहिती मिळताच पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी , पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे ,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून आरोपीस शिताफीने अटक केली .
याबाबत अधिक माहिती अशी की ,
जामनेर तालुक्यातील नांद्रा या लहानशा गावात मजुरी करून गुजराण करणाऱ्या कुटुंबात मध्यरात्री हृदय पिळवटून टाकणारी ही घटना घडली . नांद्रा प्र .लो . येथील रहीवाशी
निलेश आनंदा पाटील हा पुणे येथे रोजंदारीवर काम करीत होता .मात्र लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर काम धंदा बंद झाल्याने तो आपल्या गावी आलेला होता ,तर त्याचा लहान भाऊ महेंद्र आनंदा पाटील हा जळगांव येथे एका खासगी चटई कंपनीत कामाला होता तसेच गेल्या ६ महिन्यापूर्वी तो पत्नी अश्विनीसह कुसुंबे येथे राहत होता . दरम्यान जळगाव येथे आठ दिवसांचा जनता कर्फ्यू लागू झाल्याने काम बंद असल्याने महेंद्र आपल्या गावी आई वडिलांच्या भेटीसाठी पत्नीसह आलेला होता . निलेश हा शेजाऱ्यांशी भांडत असताना भाऊ महेंद्र आणि वडील आनंदा पाटील यांनी निलेशला का भांडतो ? याचा जाब विचारत चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत घरी आणून भांडण मिटविले .परंतु निलेशच्या मनात याबद्दल प्रचंड राग उफाळून आलेला होता याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती .

अन घडला थरार ….
रात्रीचे अकरा वाजले .. …आई -वडील बाहेर झोपलेले असताना निलेशने घरातील धारदार चाकूने वडीलांवर वार केले .वडिलांचा आक्रोश ऐकून महेंद्र आणि त्याची पत्नी अश्विनी सोडवण्यासाठी धावले .संतप्त झालेल्या निलेशने आपल्या लहान भावावरही चाकूने वार करून निर्घृण हत्या केली . या दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले . मनाचा थरकाप उडवणारे हे दृश्य पाहून आपल्या जिवाच्या आकांताने अश्विनी बाहेर पळाली म्हणून तीचा जिव वाचला .
या घटनेची वार्ता कळताच गावातील लोक जमा झाले .नांद्रा प्रलोचे पोलीस पाटील दिनेश रामा कुहाडे यांनी पहूर पोलीसांना खबर घटनेची खबर मिळताच पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे , पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी,पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे,पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले . घटनेचा पंचनामा करून आरोपी निलेश आनंदा पाटील यास ताब्यात घेतले .
याप्रकरणी अश्विनी महेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निलेश आनंदा पाटील याच्याविरुद्ध भाग पाच गुन्हा रजिस्टर नंबर २०१ अन्वये भादंवि ३०२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पहूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे .या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राकेशसिंग परदेशी करीत आहेत .

फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल –

जळगाव मोबाईल फॉरेन्सिक विभागाचे विकास वाघ ,हरीश, परदेशी दीपक चौधरी यांच्या पथकासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंहपरदेशी यांनी आज सकाळी नांद्रा प्र .लो .येथे घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त केला .
दरम्यान , चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी पहूर पोलिस ठाण्याला भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली घेत आरोपीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगीतले .