नाचणखेडा येथे युवकाचा पाण्यात बुडुन मृत्यु .

0
147

एकुलती दि .२ ( नाना कोळी): – पाळधी ता जामनेर-येथून जवळच असलेल्या नाचनखेडा ता जामनेर येथील सोमनाथ अशोक वाघ (वय ३२)याचा नाचनखेडा येथील गावाजवळून जाणाऱ्या नाचन नदीतील खड्ड्यात बुडून मृत्यू झाला
काल पोळा सण साजरा केल्यानंतर सोमनाथ वाघ हा रात्री पर्यंत घरी परतलाच नाही घरच्या मंडळीनी शोधाशोध केली असता सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अनोळखी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला व घटनेची माहिती गावात पोहचली मृतात्म्यास पाहण्यास मोठी गर्दी जमली व घटना स्थळावरून पहुर पोलिस स्टेशनशी संपर्क साधून घटनेची माहिती मिळताच किरण बर्गे (पोलीस उपनिरीक्षक), शशिकांत पाटील(हवालदार), नितीन सपकाळे(पोलीस नाईक), संतोष कुमावत,(पोलीस मित्र) हजर झाले व पाण्यामध्ये तरंगत असलेला मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला असता त्याची प्राणज्योत मालवलेली होती त्यानंतर श्वविच्छेदनासाठी पहुर ग्रामीण रूग्णालय येथे दाखल करण्यात आले होते पहुर पोलीस स्टेशन येथे मंगेश वाघ यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर पुढील तपास नितीन सपकाळ (पोलिस नाईक)करीत आहे ऐन सणाच्या दिवशी घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने परिवार,व नातेवाईकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + four =