GM NEWS,BREAKING: गोंदेगाव येथील विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्या ४ जणांना अटक . जामनेर न्यायालयाने सुनावली १ दिवसाची पोलीस कोठडी .

0
582

पहूर , ता . जामनेर दि. १३ (शंकर भामेरे ) :-

जामनेर तालुक्यातील गोंदेगाव येथे सासरच्या जाचाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेप्रकरणी पती , सासूसह सासरच्या ४ जणांना अटक करण्यात आली असून आज जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले असता १४ तारखे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
काल रविवारी गोंदेगाव येथे ५० हजार रुपये माहेराहून आणावेत या मागणीसाठी सासरी होणाऱ्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली होती . याप्रकरणी पती शकील भिकन तडवी यास कालच ताब्यात घेण्यात आले होते . तर आज तमिजाबाई भिकन तडवी , ( सासू ), जुबेर भिकन तडवी (जेठ ) , शरीफ तडवी ( मामे सासरा ) या तिघांना ताब्यात घेण्यात आले .
वरील चारही आरोपींना आज जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती सचिन हवेलीकर यांनी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे .पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किरण बर्गे करीत आहेत .