GM NEWS,FLASH: जळगांव जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी जामनेर उपजिल्हा रुग्णालयास दिली अचानक भेट ! उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाच्या पाहणीसह कोविड केअर सेंटरला सुद्धा दिली भेट . नॉन कोविड कामकाजावर लक्ष देण्याच्या दिल्या कर्मचाऱ्यांना सुचना .

0
485

जामनेर,दि.१३,जुलै (मिलींद लोखंडे ) : –

जामनेर उपजिल्हा रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण यांनी अचानक भेट देऊन उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली.तसेच त्यांनी कोव्हीड केयर सेंटर पळासखेडा येथे भेट दिली व एडमिट रुग्णांची चौकशी करण्यात आली सर्व रुग्णांनी आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केले. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व उपजिल्हा रुग्णालय येथे कोव्हीड रुग्णाशिवाय नॉन कोविड कामकाजावर लक्ष देण्याच्या सुचना देत त्यांनी गरोदर माता, प्रसूती,सीझर,लसीकरण, असंसर्गिक आजार,टी. बी ,कुष्ठरोग याबाबत सुद्धा विशेष लक्ष केंद्रित करण्याचे सुचना देण्यात आल्या. कोणत्याही नागरिकांचा स्वब हा कोरंटाईन केल्याशिवाय घेण्यात येऊ नये असे जिल्हाशल्य चिकित्सक यांनी सांगितले. याप्रसंगी नोडल अधिकारी डॉ. विनय सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.आर.के.पाटील,डॉ. स्वाती विसपुते व कोव्हीड सेंटर मधील सर्व स्टाफ व उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थीत होते.