पर्यावरण जागृतीसाठी ग्रीन आर्मी च्या विद्यार्थ्यांनी साकारला झाडातील गणपती .

0
323

जामनेर दि .२ (मनोज दुुसाने ): – तालुक्यातील मालदाभाडी परिसरात ग्रीन आर्मी च्या माध्यमातून वृक्ष लागवड संवर्धन व जनजागृती कार्यक्रम होत असतात . गणेशोत्सवाचे औचित्य साधून वृक्षाचे महत्व सांगणारा ‘मी दगडात नाही, देवळात नाही , मी झाडात आहे ! ‘ असा संदेश देणारा औदुंबराच्या झाडातील गणपती या विद्यार्थ्यांनी साकारला आहे . झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळ गाडीपासून ते म्हातारपणी च्या काठी पर्यंत उपयोगी पडते तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजनही मोफत देत असते. यास्तव ते मानवाचे दैवतच आहे . म्हणूनच आम्ही हा देखावा सादर केला असल्याचे येथील ग्रीन आर्मी च्या सदस्यांनी बोलताना सांगितले . या देखाव्यासाठी त्यांनी पर्यावरण पूरक साहित्याचा वापर केलेला आहे . तसेच लोकांच्या मनाला भावतील असे विविध संदेश पोस्टर्स देखील लावण्यात आलेल्या या देखाव्यासाठी विद्यार्थ्यांना ग्रीन आर्मी चे प्रमुख विजय सैतवाल चित्रकला शिक्षक एन. जी .पाटील व जी .टी . पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे .निसर्गरम्य वातावरणात साकारलेला हा देखावा पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी होत असून परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे . या देखाव्यासाठी ग्रीन आर्मी चे सदस्य तेजस जंगले, पवन खराटे , वैभव कापसे , तेजस ढोकणे , भूषण पालवे ज्ञानेश्वर पालवे, ऋषिकेश वंजारी , देवेंद्र घुगरे , लक्ष्मी पारपोळ , नेहा पाटील, वृषाली गव्हाळे , प्रियांका दहातोंडे, दिव्या पाटील यांच्यासह ग्रीन आर्मीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आहे. या कार्यास विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार, श्रीमती के. आर. महाजन , ए. बी. पाटील, एन. एस. पाटील, एन. एस. चौधरी, मनोज जैन, राजू मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × one =