GM NEWS,अभिनंदनीय वृत्त : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ महीला आघाडीच्या राज्य कार्यकारणी जाहिर . राज्यअध्यक्षपदी श्रीमती पुष्पलता पाटील , राज्य महासचिवपदी पुष्पलता मुळे तर जळगाव जिल्हा अध्यक्षपदी पपिता जोशी यांची निवड.*

0
337

जळगांव, दि.14 जुलै ( मिलींद लोखंडे ) : –
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ महिला आघाडीच्या राज्यकार्यकारणी निवडी बाबत तसेच जिल्हाध्यक्ष साठी लोकशाही पद्धतीने आँनलाईन राज्य स्तरीय वेबीनार चे आयोजन नुकतेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा आजच्या कार्यकारिणीचे निवडणूक निर्णय अधिकारी किशोर पाटील कुंझरकर यांनी केले होते.
झूम अॅपच्या व्हर्चुअल मिटिंग माध्यमातून राज्य महिला कार्यकारिणी निवड करण्यात याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आली . यामध्ये प्रामुख्याने राज्याध्यक्ष पदी पुप्षलता आनंदराव पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कृष्णराव नगर पाचोरा जिल्हा जळगांव यांची निवड करण्यात आली तर राज्य महासचिव पदाववर पुष्पलता अशोक मुळे (मुंबई ) यांच्यासत राज्य कार्याध्यक्ष पदी श्रीमती .पी के जाधव,राज्यकोषाध्यक्ष वंदना शिंदे (जालना ) , राज्य उपाध्यक्ष मनिषा मोराळे( बिड),श्रीमती मीनाताई पगारे-सरचिटणीस (मुंबई उपनगर ) ,श्रीमती सुनिता विजय काटम-राज्य सहसचिव (पुणे) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे .
यासोबतच जालना जिल्हाअध्यक्ष पदी श्रीमती प्रभा जाधव , जळगांव जिल्हाअध्यक्ष पदी श्रीमती पपीता यादवराव जोशी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंझर तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव, ठाणे जिल्हाअध्यक्ष पदी -डाँ सुनिता वनाजी बेडसे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलिंब तालुका कल्याण जिल्हा ठाणे, यवतमाळ जिल्हाअध्यक्ष पदी ज्योती चिकणे,तर श्रीमती विश्वंभरी कदम यांची कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी तसेच
जालना जिल्हासचिव मंदा पाटोळे,जालना जिल्हाकार्यध्यक्षपदी. श्रीमती पगारे , बदनापुर तालूकाध्यक्ष पदी श्रीमती .आर्चना लाटे आदींची ची आँनलाईन वेबीनार द्वारे निवड राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी जाहीर केली.उपरोक्त सर्व महीला भगिनीचे महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरूण जाधव ,राज्य महासचिव तथा निवडणुक निर्णय अधिकारी किशोर पाटील कुंझरकर ,राज्य नेते विलास इंगळे,राज्य समन्वयक पि यू आरसूड ,राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब हंगे,दत्तात्रे माघाडे, संजय थोरात, वदंना शिंदे, जिल्हाअध्यक्ष अच्यूत साबळे, जिल्हासचिव परमेश्वर साळवे, ईत्यादी नी अभिनंदन केले. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय नामदार वर्षाताई गायकवाड यांना आगामी काळात भेटून चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडवू असे यावेळी राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी म्हटले. आपण महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर हे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सर्वांना सोबत घेऊन करीत असलेले प्रभावी कार्य पाहून त्यांनी उभारलेले चळवळ महत्त्वपूर्ण असून म्हणून महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या राज्यस्तरीय महिला कार्यकरणी ला जॉईन झाले असून मला राज्य अध्यक्षपदी संधी मिळाल्याचा सार्थ अभिमान असून त्यांच्या माध्यमातून महिलां शिक्षकांचे प्रश्न सोडवू असे नूतन पदाधिकारी महिला विभाग राज्याध्यक्ष पुष्पलता पाटील जळगाव व राज्य महासचिव पुष्पलता मुळे मुंबई राज्य सहसचिव सुनिता विजय काटम पुणे,जळगाव जिल्हाध्यक्ष पपीता जोशी, ठाणे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनिता बेडसे, यांनी आयोजित मीटिंग मध्ये आपली भुमिका मांडताना म्हटले.