पहुर येथील पोलिस ठाण्यात सहा. पोलिस निरीक्षक राजेश काळे यांनी स्विकारला पदभार .

0
258

पहुर. ता.जामनेर दि .२ ( संतोष पांढरे ) :- पहुर येथील पोलिस ठाण्यात सहा. पोलिस निरीक्षक पदी राजेश काळे यांनी पदभार स्विकारला आहे.

गेल्या८ते१०दिवसांपूर्वी पहुर पोलिस ठाण्यातील सहा. पोलिस निरीक्षक दिलिप शिरसाट यांची जिल्हा मुख्यालयात बदली झाली होती. तेव्हापासून ही जागा रिक्त होती.ऐन सणासुदीच्या काळात कर्तव्य दक्ष अधिकारी शिरसाट यांच्या अचानक आलेल्या बदलिच्या आदेशाने सर्वसामान्य जनतेला आश्चर्याचा धक्काच बसला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. ऐन सणासुदीला पोलिस ठाण्यात अधिकारी नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु ही समस्या लक्षात घेता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी काल दि.१रोजी जामनेर पोलिस ठाण्यात गेल्या एक वर्षापासून कार्यरत असलेले राजेश काळे यांची पहुर पोलिस ठाण्यात बदली केली आहे. त्यांनी त्यांच्या पदाची सुत्रे स्विकारली आहेत. राजेश काळे हे सुध्दा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून परीचीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here