GM NEWS, FLASH: पहूर पेठ व सांगवी येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय . स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहूर पेठ ग्रामपंचायतीने घेतला सहभाग .

0
196

पहूर , ता . जामनेर दि . २५ ( शंकर भामेरे )जामनेर तालुक्यातील पहूर पेठ आणि सांगवी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महिलांसाठी सुलभ शौचालयाची बांधणी करण्यात आली आहे .
२०१९-२०२० स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकनियुक्त सरपंच सौ. नीता रामेश्वर पाटील, उपसरपंच शामराव सावळे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने महिलांसाठी सांगवी आणि पहूर पेठ येथे सुलभ शौचालय बांधण्यात आले आहे . ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाबद्दल कौतुक होत आहे .