GM NEWS, ALERT : जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे अखेर कोरोनाचा शिरकाव . एक व्यक्ती पाॕझिटीव्ह तर तीन व्यक्ती निगेटीव्ह . वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहीती .

0
1148

तळेगाव ,ता.जामनेर दि .२५ ( डॉ. गजानन जाधव ) : –

जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे अखेर कोरोना ने शिरकाव केला असून १ व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे . तसेच ३ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत .
तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी तळेगाव येथे येऊन माऊली चौक परिसर बंद करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या तसेच समुपदेशन केले यावेळी डॉ. मनोज तेली वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक अंबादास पारसेवार आरोग्य सेविका दुर्गा जाधव निलेश वरिष्ठ आरोग्यसेविका कराळे समुदाय आरोग्य आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी वाघ आशा वर्कर आरोग्य तबला अंगणवाडी सेविका कंटेनमेंट झोन तयार करून फवारणी करण्यात आली व सर्वे करण्यात आला व्यक्तींची तपासणी करण्यात आली योग्य त्या काळजी घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या व परिसर तीन ठिकाणाहून बंद करण्यात आला