पहूर , ता. जामनेर दि . २७ ( शंकर भामेरे ) :-

जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील १७ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी आरोपीस १ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेंगोळा येथील अल्पवयीन बालीकेवर घराशेजारीच राहणाऱ्या अनिल सुरेश घोरपडे याने शनिवारी रात्री बलात्कार करून पिडीतेस मारहाण करीत डबक्यात फेकून दिल्याची संतापजनक घटना घडली होती .
याप्रकरणी पहूर पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता .
आज सोमवारी (दि. २७ ) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जामनेर न्यायालयाचे विषेश न्यायाधिश श्री .लाडेकर यांच्यासमोर आरोपीस हजर केले असता त्यास (१ दिवसाची ) २८ जुलै २०२० पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे यांनी दिली .