पहुर, ता. जामनेर दि . 29 (शंकर भमेरे ) :-
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री.गोरे व उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकाडे यांचे सूचनेनुसार अवैध धंदे विरुद्ध मोहीम अंतर्गत पहूर पोस्ट हद्दीत तोडापुर गावात वाकोद जामनेर रोड वरील कॉम्प्लेक्स च्या पाठी मागे शेडमध्ये काही ही इसम देशी-विदेशी दारू अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती गुप्त बातमी दारा मार्फत काढून स्वतः सपोनि राकेश सिंह परदेशी यांनी त्यांचे सहकारी पोलीस हवालदार प्रदीप चौधरी पोलीस शिपाई जितू सिंग परदेशी पोलीस शिपाई अनिल देवरे यांच्यासह मिळून रात्री 9.00 ते 10:30 वा चे सुमारास वरील ठिकाणी छापा मारून आरोपी 1 श्वेतांबर नामदेव वाघ 2 राजू खरात दोन्ही राहणार तोंडापूर 3 गणेश शिरे राहणार ढाल शिंगी यांचे ताब्यातून विदेशी दारू च्या सतरा बाटल्या व देशी दारूच्या 88 बाटल्या एकूण किंमत रुपये 5732 जप्त करून वरील आरोपिता विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.