जळगांव, दि. २९ ( मिलींद लोखंडे ) : –
यावल तालुक्यातील फैजपूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यात १ लाख ७ हजार ४३१ रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे . यामुळे कारवाईमुळे तालुक्या सह जिल्हाभरात मद्य माफियांमध्ये खळबळ उडाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , राज्य उत्पादन शुल्क भुसावळ येथील ई. ना . वाघ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार त्यांनी फैजपूर तालुका यावल येथील श्रीराम टॉकीज जवळ एका बंद खोलीत असलेल्या बेकायदा मद्यसाठ्या वर छापा मारला . या छाप्यात
८७३६० देशी टॅगोपंच १८० मिली च्या एकूण १६८० सिलबंद बाटल्या ३५ बॉक्स .
२४९६ रुपयांचे देशी दारू बॉबी संत्रा १८० मिलीच्या ४८ सिलबंद बाटल्या १ बॉक्स, १०५० रुपये किमतीचे मॅक्डोनॉल्ड व्हीस्की १८० मिलीच्या एकूण ७ बाटल्या ,
५५२५ रुपयांचे नाईट मॉल्टस व्हिस्की ७५० मिली च्या एकूण १३ सिलबंद बाटल्या (मध्यप्रदेश निर्मित व महाराष्ट्रात विक्री व बा बण्यास प्रतिबंध असलेल्या)
५९ ५० रुपये किमतीचेपाण्याच्या प्लास्टिक जार मध्ये १० लिटर बनावट विदेशी मद्य , ५० रुपये रॉयल नाईट मॉल्ट व्हिस्की ७५० मिलीच्या एकूण ७ बाटल्या ,
५००० रु किमतीचा ओपो कंपनीचा १ वापरता भ्रमणध्वनी असा एकूण १लाख ७ हजार ४३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . सदर कारवाई मा . आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई , विभागीय उपायुक्त अ .ना . ओहोळ , अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली .या पथकात राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे ई. ना वाघ ,विभागीय भरारी पथक श्री . फुलझळके , मुक्ताईनगरचे जाखेरे , दुय्यम निरीक्षक के. एन . बुवा , दुय्यम निरीक्षक के. बी . मुळे , तसेच जवान एस . एस निकम , विपूल राजपूत , व्ही . डी . हटकर , वाय. आर .जोशी , भुषण वाणी , नंदू पवार , शिंदे , गायकवाड आदींचा सहभाग होता .याप्रकरणी विकी प्रकाश अठवाणी रा फैजपूर , ता . यावल याच्या विरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा १९४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे .पुढील तपास भुसावळचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक ई. ना . वाघ करीत आहे . या कारवाईमुळे जिल्हाभरातील मद्य माफीयांमध्ये खळबळ उडाली आहे.