GM NEWS, FLASH: जळगांव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 31 जुलै रोजी साधणार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरीकांशी संवाद.

0
420

जळगाव,दि.३० ( मिलींद लोखंडे ) : –

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे. या प्रयत्नांना आपल्या जळगाव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व जनतेने समर्थ साथ दिली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात काही प्रश्न असू शकतात याची जिल्हा प्रशासनाला कल्पना आहे. लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचे निराकरण व्हावे, यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जळगावच्यावतीने फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शुक्रवार, दि. 31 जुलै, 2020 रोजी दुपारी 12:00 वाजता जनतेशी LIVE स्वरूपात संवाद साधून जनतेच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.
हा संवाद https://www.facebook.com/CollectorateJalgaon या फेसबुक पेजवरून साधणार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोना विषाणू व त्यासंबंधी जिल्ह्यातील परिस्थितीबाबत त्यांच्या मनातील शंका, समस्या, प्रश्न या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडावेत. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी केले