जामनेर , दि . ३० ( विलास ढाकरे ) : –

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील सख्य्या मेहुण्यावर धारदार चाकूने सपासप वार करून निर्घुण हत्या केल्याची खळबळजनक घटना काल दि.२९ रोजी रात्री घडली .

याबाबत अधिक माहिती अशी की , जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक येथील रहीवासी असलेल्या भागवत मोतीराम पारधी ( वय ३० वर्षे ) यांची नेरी येथील रहिवासी असलेल्या परमेश्वर पारधी या सख्ख्या साल्याने धारदार चाकूने सपासप वार करून अमाणूषपणे हत्या केली .
मयत भागवत पारधी याच्या सोबत आरोपीच्या बहीणीचे लग्न ४ वर्षा पुर्वी झालेले होते परंतु मयत भागवत याला दारुचे व्यसन असल्या मुळे पत्नी सुरेखा हिच्या सोबत त्याचे नेहमी भांडण व्हायचे त्यामुळे सुरेखा ही आपल्या माहेरी नेरी येथे निघुन यायची . मेहुण्याचा बहिणाला वारंवार होणारा त्रास आरोपी परमेश्वर पारधी याला असह्य व्हायचा .तर पत्नीचे वारंवार माहेरी निघुन जाणे मयत भागवत पारधी याला खटकत होते त्यामुळे हा वाद नित्याचा झाला होता . यातच गेल्या आठ दिवसा पुर्वी मयत भागवत पारधी त्याचा शालक परमेश्वर पारधी यांच्यात कडाक्याचे भांडण झालेले होते . झालेल्या भांडणाचा राग व बहिणीला होत असलेला त्रास यामुळे परमेश्वर पारधी हा मेहुणा भागवत पारधी याचा कायमचा काटा काढायचा या हेतुने काल नेरी येथून दुचाकीवर चिंचखेडा बु येथे आला व काही तरी कारण सांगुन मेहुणा भागवत याला आपल्या दुचाकीवर बसवुन लहासर फाटा जंगलाच्या रस्त्याने घेऊन गेला त्यानंतर त्यांच्यात वाद झाला आणि यादरम्यान मनात खुणगाठ बांधलेल्या शालक परमेश्वर याने मेहुण्याच्या मानेवर पोटावर स्वतः जवळील धारदार चाकुचे वार करून खुन केला . आरोपी परमेश्वर पारधी एवढ्यावरच थांबला नाही तर तो शांत डोक्याने काल रात्री साधारण १० वाजेच्या दरम्यान चाकुसह जामनेर पोलीस स्टेशनला स्वतः हजर झाला व त्याने केलेल्या गुन्ह्याची स्वतः कबुली दिली . परंतु रात्री जामनेर परीसरात कोसळलेल्या जोरदार पावसा मुळे व अंधारा मुळे घटना स्थळ गाठायला पोलीस यंत्रणेला अडथळे आले त्यामुळे आज सकाळी जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून तपास केला असता भागवत पारधी याचा मृदेह लहासर फाटा जंगलात आढळून आला . घटनास्थळी चाळीसगांव विभागाचे अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे व पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन परीस्थीतीची पाहणी केली . परमेश्वर पारधी याच्यावर जामनेर पोलीस स्टेशनला भा. द .वि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील अधिक तपास जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस करत आहेत .
कौटुंबिक नाते संबंधाला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे .