माणुसकी ग्रुपच्या आदर्शाने जळगावच्या वाणी कुटुंबीयांनी मुलीचा वाढदिवस केला विधायक कार्यक्रमांनी साजरा .

0
422

लोहारा ता.पाचोरा/ दि .४ ( ज्ञानेश्वर राजपुत ) : –
जळगाव येथील गणेश कॉलनीतील रहिवासी मनोज वाणी सौ.अनिता यांच्या कुमारी अंकिता या मुलीचा दिनांक ३ सप्टेंबर मंगळवार रोजी २६ वा वाढदिवस होता याअगोदर कुटुंबीय सदन व उच्चशिक्षित असल्याने आपल्या कुमारी अंकिताचा सामान्यपणे वाढदिवस साजरा करत असत मुलगा हा वंशाचा दीपक असतो ही भ्रामक कल्पना आता दैनंदिन समाजामध्ये बदलत चालली आहे मुलगा मुलगी एक समान समजली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना दिसतात त्यातला हा एक सुखद प्रकार होय मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यात
या दिवशी आपण समाजाचे काही देणं लागतो व त्याची थोड्याफार प्रमाणात परतफेड करायला हवी असा विचार अंकिताच्या मनात आला व अश्या वेळेस कुटुंबियांच्या डोळ्यापुढे माणुसकी गृपचे नाव आले माणुसकी नावाप्रमाणे हा ग्रुप समाजसेवेत समाजाची अतिशय निस्पृहपणे सेवा करतोय आणि एक व करत आहे.त्यांच्या मदतीने इंडियन रेडक्रॉस येथे आई अनिता वाणी यांनी रक्तदान करून आपल्या घरासमोर असलेल्या परसबागेत वृक्षारोपणही केले व कुटुंबीयांसह माणुसकी ग्रुपचे जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर,अंकिताचे वडील मनोज वाणी सौ. अनिता वाणी(आई),चंद्रकांत गीते (जवान सीआरपीएफ), प्रवीण माळी(कुऱ्हाड) यांसोबत हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बिस्किटपुड्यांचे वाटप केले. या कार्याचे सुलक्षमी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमितभाऊ पंडित यांनी वाणी कुटुंबीयांसह खान्देशात कार्याचा पसारा फुलवण्यासाठी मदत करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =