GM NEWS,प्रेरणादाई वृत्त: जळगांव शहरातील जी.एम फाउंडेशन कोविड 19 केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांची करोनावर मात . कोरोना मुक्त होऊन सुखरूप गेले घरी .

0
203

जळगाव, दि.२१ ( मिलींद लोखंडे ) : –
जळगांद शहरापासून जवळच असलेल्या जी.एच.रायसोनी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जी.एम.फाऊंडेशन मित्र परिवारतर्फे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. आज या कोविड केअर सेंटर मधुन 10 करोना रुग्णांनी करोनावर मात करुण ते आपल्या घरी सुखरूप रवाना झाले आहेत .
21 जुलै रोजी आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते जि.एम फाऊंडेशन कोविड 19 केयर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते.

जी.एम.फाऊंडेशन व मित्र परिवारतर्फे जी.एच.रायसोनी महाविद्यालयात ३०० पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था असलेले कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये आज रोजी साठ करोना रुग्ण उपचार घेत आहे आज रुग्णांना सुट्टी देते वेळी जळगाव महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाँ.सजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. सेंटरचे डॉक्टर डाँ.मोनिसा शेख.डाँ.बी एस सांवत डाँ.प्रमानंद पाटील. परिचारिका पुनम सोनवने सेन्टर चे व्यवस्थापक शिवाजी पाटील नोंदणी व भोजन व्यवस्था प्रमुख अक्षय जाधव , मनोज पाटील यांच्या सह नंदु आडवानी ,अरविंद देशमुख, पितांबर भावसार आदी उपस्थीत होते .