GM NEWS, अभिनंदनिय वृत्त : जामनेर तालुक्यातील पहूर आर . टी .लेले हायस्कूलचे एस . एस .सी .परीक्षेत स्पृहणीय यश . उज्वल यशाची परंपरा कायम राखत 91.85% लागला निकाल . गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षकांनी केला सन्मान .

0
412

पहूर , ता . जामनेर दि . ३०( शंकर भामेरे ) :-

जामनेर तालुक्यातील पहूर येथील हुरूप एज्युकेशन सोसायटी संचलित आर टी लेले हायस्कूलने उज्वल यशाची परंपरा कायम राखत एस.एस. सी. परीक्षा मार्च-2020 मध्ये स्पृहणीय यश संपादन केले आहे .
मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वीच्या परीक्षेचा शाळेचा निकाल 91.85% लागला असून 135 विद्यार्थ्यांपैकी 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . यात विशेष प्राविण्या सह 17विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 46 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे .द्वितीय श्रेणीत 47 विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केलेले विद्यार्थी 14 आहेत.

शालेय यशाचे मानकरी –

*1)प्रथम क्रमांक:–कु.लहासे संजीवनी अरुण:–83%*
*2)द्वितीय क्रमांक:–कु.पवार दिव्या ज्ञानेश्वर:–82.80%*
**3)तृतीय क्रमांक:– कु.चौधरी प्रियंका सुशील:– –81.80%*

शाळेने प्राप्त केलेल्या या उज्ज्वल सुयशाबद्दल संस्थेचे चेअरमन- आमदार गिरिष महाजन , संस्थेचे व्हॉइस चेअरमन साहेबराव देशमुख,संस्था सचिव डॉ. अनिकेत लेले, संस्था सदस्य राजधर पांढरे, अॅड. एस. आर. पाटील व इतर सर्व संचालक मंडळ ,मुख्याध्यापक सी. टी. पाटील,पर्यवेक्षक आर. बी. पाटील ,वरिष्ठ लिपिक किशोर पाटील यांनी व परिसरातील प्रतिष्ठित सर्वांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे,शाळेचा सर्व कर्मचारी वृंद यांचे सहर्ष अभिनंदन करून ,कौतुक करून आनंद व्यक्त केला आहे .विद्यार्थ्यांच्या भावी यशस्वी वाटचालीकरिता ही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अन् गुणवंतांचा घरी जावून केला सत्कार –

निकाल जाहीर होताच शाळेतून गुणानुक्रमे प्रथम ,द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेचे शिक्षक आर .एम . कलाल , अनिल पाटील , संतोष भडांगे यांनी घरी जावून पालकां समवेत पेढा भरवून सत्कार केला .आपले गुरुजन आपल्या सन्मानासाठी आपल्या घरी आल्याचे पाहून गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही भारावून गेले .