GM NEWS , ALERT: खबरदार…! रस्त्यावर थुंकलात तर … 500 रु . विना मास्क फिरताहेत तर … 500 रु दंड भरावा लागणार. जळगाव जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती . जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश .

0
1022

जळगांव दि . 31 ( मिलींद लोखंडे ) : – जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमणाचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने विविध प्रतिबंधात्मक उपाय राबविले जात आहेत .याच उपाययोजनांचा एक भाग म्हणूनआज जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्हा कार्यक्षेत्रात नियंत्रण पथकांची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत .

असे असणार नियंत्रण पथक –

महानगरपालिका क्षेत्रासाठी वार्ड / प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असेल .या स्वतंत्र पथकाची सनियंत्रण व पर्यवेक्षण करण्यासाठी एका स्वतंत्र नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार असून सदरील पथकास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येणार आहे ..
तसेच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद गट निहाय व नगरपालिका क्षेत्रात वॉर्ड / प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र पथकाची स्थापना करून त्यांना दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येणार आहे.सदर नियंत्रण पथकास त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करण्यासाठी आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांनी त्यांच्या अधिनस्त वाहन उपलब्ध करून द्यावे .उपविभागीय दंडाधिकारी यांनी जिल्हा परिषद गटनिहाय स्थापन केलेल्या पथकास दंडात्मक कार्यवाही करण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्यास कार्यक्षेत्रातील इतर विभागाकडील वाहनांचे अधिग्रहण करून त्यांना वाहन उपलब्ध करून देण्यात यावे .

काय आहेत निकष ?
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्या आदेशात म्हटले आहे की ….

मास्कचा वापर –
सार्वजनिक ठिकाणी /कामाच्या ठिकाणी /वाहतूक प्रवास करताना मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील .एखाद्या व्यक्तीच्या / नागरिकाच्या तोंडावर मास्क आढळून न आल्यास 500रुपये दंडाची आकारणी करण्यात येणार आहे .

दुचाकी वाहन चालवताना मास्क वापरणे अनिवार्य आहे .

तीन चाकी वाहन वापरताना अत्यावश्यक कारणासाठी चालक आणि दोनच प्रवासी यांना परवानगी असेल .

चार चाकी वाहन चालविताना चालकासह तीन प्रवासी यांना परवानगी असेल .

वर नमूद केल्या नुसार वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यास वाहनास 500 रुपये दंडाची आकारणी करावी तसेच सदर वाहनांचा अहवाल तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर करावा . अशा प्रकारे अहवाल प्राप्त झालेल्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी नियमानुसार त्यांचा परवाना निलंबित दंडाची आकारणी करण्याची कार्यवाही करावी .

कोणत्याही दुकानात किंवा आस्थापनेत एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाही .

विना मास्क दुकानात येणार्‍या कोणत्याही ग्राहकास दुकान मालक /चालक यांनी माल किंवा सुविधा यांचा पुरवठा करू नये .

सर्व दुकाने /आस्थापना येथील दुकान मालक /चालक /कर्मचारी व ग्राहक यांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील .

वर नमूद केलेल्या बाबींचे उल्लंघन केल्याससंबंधितास 500 रुपये दंडाची आकारणी करून सदर संबंधित दुकान मालक / चालक यांनी वर नमूद बाबींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास तत्काळ दुकान व आस्थापना सिल करण्याबाबत कार्यवाही करावी .

एका ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन न करता पाच पेक्षा जास्त जमा झालेले नागरिक / व्यक्ती यांना प्रतिव्यक्ती 200 रुपये प्रमाणे दंड आकारण्यात यावा . (लग्न समारंभासाठी 50 व्यक्ती स तर अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींना परवानगी असेल )

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 500 रुपये दंडाची आकारणी करावी .

सदर कारवाईचा दैनंदिन अहवाल
नोडल अधिकारी यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना विहित नमुन्यात आणि विहित वेळेत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .