GM NEWS, आंदोलन वृत्त : शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो म्हणत सरकार स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचीच केली घोर निराशा – आ. गिरीश महाजन .

0
1157

जामनेर,दि,१ऑगष्ट ( विलास ढाकरे ) : –

सात महिन्यांपूर्वी राज्यात महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र येत असून सरकार स्थापन करीत आहोत असे म्हणत सरकार स्थापन केल्या नंतर मात्र तमाम जनतेची व शेतकरी वर्गाची  महाविकास आघाडी सरकार  कडून उपेक्षाच केली जात असून अपेक्षित न्याय दिला गेला नसल्याचा आरोप माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे .
भारतीय जनता पक्षाच्या वतीने दूध उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या दिवसें दिवस वाढत जाणाऱ्या समस्यांकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष याबाबत लक्ष वेधण्यासाठी जामनेर येथील नगरपालिका चौकात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनाचे आयोजन आज करण्यात आले होते . जिल्ह्यात ठीक ठिकाणी व राज्यभरात भाजप कडून आंदोलन करण्यात आले .
आघाडी शासनाकडून सर्वच शेतकरी हिताच्या योजना बंद करण्याचा सपाटा सुरू असून पुर्वोच्या योजना या जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यात राज्यात चांगल्या योजना शेतकरी कष्टकरी जनतेच्या हिताच्या होत्या त्या सर्व योजना थंड बस्त्यात टाकून बंद करून टाकल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी या आंदोलनाला संबोधीत करतांना केला आहे पुढे ते म्हणाले की, राज्य शासनाने मका कापूस खरेदी बंद केली आहे शेतकऱ्यांच्या घरामध्ये शेतमाल पडला असून शेतकऱ्यांचा लागवडीसह मशागतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च झालेला आहे . यासोबतच मागेल त्याला शेततळे योजनेतील संबंधित शेतकऱ्यांना शेततळी न दिल्याने त्यांना शेतीला पाणी देता येणार नाही . यासारख्या योजना बंद केल्या आहेत शेतकऱ्यांच्या बांधावर खते बी-बियाणे देऊ असे म्हणणाऱ्या सरकारच्या काळात दुकानात देखील खत मिळत नाहीत अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे दूध उत्पादक शेतकरी देखील बेजार झाला असून लवकरात लवकर या सर्व समस्यांचे निराकरण झाले नाही तर सरकार विरोधात यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी मंत्री महाजन यांनी या आंदोलना दरम्यान दिला आहे . या रास्ता रोको आंदोलनात नगरपालिका चौकात स्वतः गिरीश महाजन यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको करून तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर ,शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष दिलीप खोडपे ,नवल पाटील, चंद्रशेखर काळे, बाबुराव घोंगळे ,राजधर पांढरे ,अरविंद देशमुख,
अमर पाटील ,गोविंद अग्रवाल, महेंद्र बाविस्कर ,वासुदेव घोंगडे,रवींद्र झाल्टे, यांच्यासह भाजपा पदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दुधाचे आणलेली कॅन तहसिलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली दुधाची आम्ही नासाडी करणार नाही मात्र हे दूध कोविड सेंटरला देण्यात यावे असे यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी तहसीलदार यांना सांगितले .