GM NEWS,अभिनंदनीय वृत्त : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते महसुल दिना निमित्त महसुल कर्मचाऱ्यांचा जामनेरात गौरव. उल्लेखनिय कार्य करणाऱ्या जामनेरसह जळगाव महसुल कार्यालयातील ११ कर्मचाऱ्यांचा समावेश.

0
322

जामनेर , दि .1( विनोद बुळे ) :-

जामनेर येथील तहसील कार्यालयात आज 1 आगस्ट 2020 रोजी महसूल दिनाचे औचित्य साधून महसूल विभागात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला . जामनेर तहसिल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते .
प्रारंभी लोकमान्य टिळक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महापुरुषांच्या प्रतिमांसह ब्रिटीशकालीन काळात प्लेग संसर्गावर उपाय योजना करतांना कर्तव्यावर हौतात्म्य प्राप्त झालेले मंडल अधिकारी स्व. कुरकुरे यांच्या प्रतिमेचे सुद्धा मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले .
आज जामनेर येथे तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जळगाव उपविभागातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या11 कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे .यामध्ये जळगाव येथील नायब तहसीलदार शितल साळवे , अव्वल कारकून मनोज सपकाळे (जामनेर ) , मंडळ अधिकारी विष्णू पाटील (जामनेर ) ,लिपिक मधुकर पाटील (जामनेर ), तलाठी प्रशांत पाटील (जामनेर ) , शिपाई प्रकाश जगताप (जामनेर ), कोतवाल संतोष कोळी (जामनेर ) , मंडळ अधिकारी जगदिश गुरव (जळगांव ), अव्वल कारकून रशिद तडवी (जळगाव ) , लिपीक उमेश दांडगे (जळगाव ) , तलाठी रमेश वंजारी (जळगाव )या अकरा कर्मचाऱ्यांचा सन्मानार्थींमध्ये समावेश असून जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे .यावेळी जामनेरचे तहसिलदार अरुण शेवाळे ,यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते . यावेळी कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले .