GM NEWS, साहित्यीक वार्ता : पहिल्या तावडी बोली राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या ‘भुईफोक ‘ स्मरणिकेचे आमदार गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रकाशन . ‘भूईफोक ‘ स्मरणिका साहित्यिकांना मार्गदर्शक ठरेल – आमदार गिरीश महाजन यांचे प्रतिपादन . जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाने 2018 मध्ये केले होते संमेलनाचे आयोजन .

0
133

जामनेर , दि . १ ( शंकर भामेरे) : –

जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाने आयोजित केलेल्या पहिल्या राज्यस्तरीय तावडी बोली मराठी साहित्य संमेलनाच्या ‘ भुईफोक ‘ स्मरणिकेचे प्रकाशन आज राज्याचे माजी जलसंपदामंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले .
जामनेरसह परिसरात बोलली जाणारी तावडी बोली आपलं स्वतंत्र अस्तित्व जोपासत असून या बोलीला साहित्याच्या क्षेत्रात नावारूपास आणण्यासाठी जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ स्थापनेपासूनच कार्य करीत आहे . रविवार दि .30 जानेवारी 2018 रोजी जामनेर नगरीत पहिले राज्यस्तरीय तावडी बोली साहित्य संमेलनमोठ्या उत्साहात संपन्न झाले . या संमेलनातून तावडी रत्नांच्या सन्मानासह तावडी बोलीचा जागर झाला . राज्य शासनाच्या साहित्य – सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने या संमेलनाला अनुदानही प्राप्त झाले होते. या संमेलनाच्या ‘भूईफोक ‘ स्मरणिकेचे प्रकाशन आज आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले . यावेळी जामनेर तालुका साहित्य – सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष , डी.डी. पाटील , कोषाध्यक्ष सुखदेव महाजन , सहसचिव जितेंद्र गोरे , कार्यकारीणी सदस्य शंकर भामेरे , पहूर शाखेचे अध्यक्ष डॉ .प्रशांत पांढरे ,जामनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, जितेंद्र नेमाडे , संतोष बारी , सेवानिवृत्त अभियंता जे .के चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी करोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले .