GM NEWS , अभिनंदनिय वृत्त : जामनेर येथील सावली प्रतिष्ठान आणि बिनधास्त ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या होणार 500 झाडांची लागवड . २ ऑगस्ट मैत्री दिना निमित्त निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आयोजकांची आवाहन .

0
113

जामनेर , दि . १ ( मिलींद लोखंडे ) : –

जामनेर येथील सावली प्रतिष्ठान व बिनधास्त गृप यांच्या संयुक्त विद्यमाने पाचशे झाडांची लागवड करण्यात येणार आहे .
ऑगस्टचा पहिला रविवार म्हणजे मैत्री दिन(फ्रेंडशिप डे)आणि त्यात श्रावणातील निसर्गरम्य वातावरण, या निमित्त निसर्गासोबतची आपली मैत्री घट्ट व्हावी ,आपल्या मैत्रीची आठवण म्हणून एक वृक्ष लावून निसर्गासोबतच्या मैत्रीचं हे नातं घट्ट करण्यासाठी सावली प्रतिष्ठान व बिनधास्त गृप यांच्या संयुक्त विद्यमाने दि .2 ऑगस्ट 2020 रविवार रोजी सकाळी 8.00 वाजता सोशल डिस्टनसिंग चे पालन करत भुसावळ रोड होळहवेली फाटा येथे 500 झाडांची लागवड करण्यात येणार आहे . यात वड, पिंपळ, सीताफळ, जांभूळ व पेरू या झाडांचा समावेश आहे . तरी या निमित्त सर्व निसर्ग प्रेमिंनी मैत्रीची आठवण म्हणून वृक्षारोपण करावे व आपला ‘फ्रेंडशिप डे ‘विशेष बनावा , यासाठी या कार्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन आयोजकांनी केले असून
ज्यांना शक्य असेल त्यांनी येतांना सोबत टिकम, फावडे, पहार आणावे आदी साहित्य सोबत आणावे असेही आयोजकांनी कळविले आहे .