GM NEWS, दिलासादायक वृत्त : जामनेर तालुक्यातील पहूर ग्रामीण रुग्णालयात सेंट्रल ऑक्सीजन प्रणाली कार्यान्वित . माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले उद्घाटन . ३० खाटांची सोय . ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना मिळाला दिलासा .

0
39

पहूर , ता .जामनेर दि . १( शंकर भामेरे ) :-

जामनेर तालुक्यातील पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांच्या सेन्ट्रल ऑक्सीजन पाईपलाईन प्रणालीचे माजी जलसंपदामंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते आज सकाळी उद्घाटन करण्यात आले .
जामनेर तालुक्यातील पाळधी , वाकोद , पहूर , शेंदुर्णीसह ग्रामीण भागात कोरोना विषाणू संक्रमणाची साखळी वाढत असल्याने शासन – प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत . या उपाय योजनांचाच एक भाग म्हणून पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेड साठी सेन्ट्रल ऑक्सिजन पाईपलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे . यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे . यावेळी तहसीलदार अरुण शेवाळे , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश सोनवणे , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदिप लोढा , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय देशमुख , माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , आरोग्यदूत अरविंद देशमुख ,सरपंच पती रामेश्वर पाटील , सरपंच पती शंकर घोंगडे ,नोडल ऑफिसर तथा पहूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा , डॉ .पुष्कराज नारखेडे , डॉ .संदीप कुमावत, डॉ . सचिन वाघ ,डॉ . जितेंद्र वानखेडे, डॉ . कुणाल बाविस्कर , प्रयोगशाळा तंत्रज्ञ ,परीचारक , परिचारिका यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी , पदाधिकारी ,पत्रकार बांधव उपस्थित होते .