पहूर येथील संतोषीमातानगरात चोरी, 28 हजार रूपये लंपास .

0
267

पहुर दि .5 (संतोष पांढरे ) :- पहुर पेठ येथील संतोषीमातानगर येथे अज्ञात चोरटय़ांनी चोरी करून 28 हजार रूपये लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री ते आज सकाळी तिन ते चार वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पहूर पेठ येथील संतोषी माता नगरातील दिपक मनोहर खाटीक यांच्या रहाते घरातील खिडकीतून टोकराच्या सहाय्याने घरात लटकविलेली पॅन्ट काढून पॅन्टच्या खिशातून 20 हजार 570 रूपये तसेच त्यांच्या शेजारी राहणारे दिलीप देवचंद भोई यांच्या रहाते घरातील खिडकीतून टोकराच्या सहाय्याने पॅन्टच्या खिशातून 8 हजात 70 रूपये असे एकूण 28 हजार 640 रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. तसेच सकुबाई सुकदेव कुमावत यांचे वालकंपाऊंड तोडून व गेटचे कुलूप तोडून याठिकाणी ही अज्ञात चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला.
याबाबत दिपक मनोहर खाटीक (वय 35 ) व दिलीप देवचंद भोई (वय 40)व संजय तोताराम बारी (वय 45 )सर्व रा. संतोषीमातानगर पहूर यांनी पहूर पोलीस स्टेशन ला तक्रारी अर्ज दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × four =