विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी शिक्षक दिना निमित्त गणपती बाप्पाला अनाहुत पत्र .

0
595

प्रिय, गणपती बाप्पा
सप्रेम नमस्कार….
वि. वि. पत्र लिहिण्यास कारण, कि बातम्या वाचल्याआणि गणराया तूझी आठवण झाली. आज शिक्षकदिनी विनाअनुदानित शाळेतील शिक्षक, कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहेत. बाप्पा, शिक्षकांच्या प्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिन साजरा करतात,पण बाप्पा…. आज हजारो शिक्षकांनाच शिक्षकदिनी शाळा बंद ठेवून काळा दिवस साजरा करण्याची वेळ आली ..
बाप्पा तू संकटह्रर्ता… विघ्नहर्ता… आहेस,परंतु विनाअनुदानित शिक्षकांच्या ह्रदयाचे बोल तुझ्या कानापर्यंत… तुझ्या ह्रदयाच्या गाभाऱ्याला स्पर्श का करू शकत नाहीत. परीक्षा घेणारयांची किती रे परीक्षा बघणार आहेस…
हजारो शिक्षक दहा-पंधरा वर्षां पासून अनुदान येईल….. पगार सुरू होईल म्हणून आशेची कस धरून आहेत. बाप्पा अजुन किती दिवस रे त्यांना आस लावून ठेवणार आहेस. वर्षभरापासून वर्षाराणीची आतुरतेने वाट बघणारया चातकाची तू इच्छापूर्ती करतोस मग या शिक्षकांकडे डोळेझाक का करतोय?
नकारात्मक विचार माणसाला कमजोर बनवतात तर सकारात्मक विचार माणसाला बलवान बनवतात, एक वेळ शरीराने कमजोर असले तरी चालेल पण मनाने कधीच कमजोर होऊ नका कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची इच्छा शक्ती प्रबळ असते,त्यांचा आत्मविश्वास मजबूत असतो. असं विद्यार्थ्यांना समजावतांना,शिकवतांना…. शिक्षकांचा आत्मविश्वास कधी, कसा हरवला हे या शिक्षकांना कळलच नाही,म्हणून बहूतेक शिक्षकांनी आपले जीवन संपवले तर काही शिक्षक इच्छामरण द्या म्हणून विनवणी करत प्रतीक्षेत आहेत.
बाप्पा…शिक्षक हे राष्ट्राच्या उभारणीसाठी आवश्यक असणारे आधारस्तंभ आहेत…. भारताच्या भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य घडविण्यार्यांचेच वर्तमान व भविष्य अंधारमय असेल तर त्यांची मानसिकता कशी असेल….
बाप्पा शिक्षकच असतो जो विद्यार्थ्यांसमोर हसत-खेळत उत्साही चेहरा करून विद्यार्थ्यांना शिकवत असतो पण त्याच्या चेहऱ्यावरच्या खोट्या हास्या मागे त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांची… गरजांची दुःखे लपलेली असतात. ती फक्त त्यालाच माहीत असतात. तुझ्या भक्तीच्या विश्वासावर एक एक दिवस ते काढीत असतात. आज ना उद्या तू पगार सुरु करशील… चमत्कार करशील…म्हणून
शिक्षक फक्त सुशिक्षित नागरिक घडवत नाही, शिक्षकांच्या हातून एक सुसंस्कारीत नागरिक घडतो. पुढील काही वर्षांमध्ये भारतात जवळपास सात कोटी मुले विद्यार्थी विद्यार्थीदशेत असतील . शिक्षकांची उपस्थिती त्यांची शिकवण्याची पद्धत आणि विचारसरणी यामुळे देशाचे धोरण ठरते. तरुणांची सुसंस्कारीत पिढी घडते. बाप्पा….. तू तर बुद्धीचा देवता आहेस. मग या सरस्वती मातेच्या उपसकांवर ही वेळ का….?
शिक्षकांना सर्वात जास्त आदराचे स्थान का दिली जाते कारण त्याच्याजवळ संयम आहे म्हणून… या प्रुथ्वीतलावर शिक्षक सोडले तर दुसरा कोणताही असा व्यक्ती नाही जो दहा- पंधरा वर्षापासून आपल्या सेवेचा कोणताही मोबदला न घेता दुसर्‍यांना सतत काही ना काही देण्यातच धन्यता मानतात.
चाणक्यांनी सांगितले आहे.कि शिक्षक कभी साधारण नही होता प्रलय और निर्माण उसकी गोद में खिलते है. परंतु बाप्पा….. आजून किती दिवस त्यांनी हे सहन करयाचे…..
अघोषित मध्ये अडकलेले… मूल्यांकन झालेले न झालेले….. शिक्षक भरतीच्या प्रतिक्षेत असलेले…. तूकडी अनुदानासाठी आस धरुन बसलेले….,खाजगी संस्थेत भविष्यात काम होईल आशेवर असलेले व तूटपुंज्य पगारावर काम करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांची प्रार्थना तू स्विकार करुन संबंधित प्रशासकीय, राजकीय यंत्रणेला सकारात्मक विचारसरणीत अजून भर पडू दे….

एक तुझाच भक्त,

जामनेर .९४२३३५९७५९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 5 =