GM NEWS , धार्मिक वृत्त : पहूर येथील श्रीराम मंदिरात अयोध्या येथील श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमित्ताने भव्य महापूजा . डॉ . प्रशांत पांढरे व सौ . किर्ती पांढरे यांच्या हस्ते पूजन .

0
122

पहूर, ता.जामनेर दि. ५ ( शंकर भामेरे ) :-

पहूर पेठ येथील राम मंदिर ट्रस्ट च्या वतीने व पहूर भारतीय जनता पार्टी चे संयुक्त विद्यमाने अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे निमित्ताने पहूर पेठ येथील प्राचीन श्री. राम मंदिरात महापूजा, अभिषेक ,आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.
यावेळी डाॅ. प्रशांत पांढरे व सौ. कीर्ती पांढरे यांच्या हस्ते श्री. राम मंदिरात महापूजा करण्यात येवून आरती व प्रसाद वाटप करण्यात आला.महापूजा येथील पंडित सुभाष पंढरीनाथ जोशी यांनी वेद मंत्रोच्चारात केली. पहूर पेठ गावांत ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून, अंगणात ठिकठिकाणी रांगोळी काढून, विजयी पताका लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
५०० वर्षांपासून प्रभू श्रीराम मंदिर प्रतीक्षा संपल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त करून प्रभू श्री रामचंद्र भगवान यांचा जयघोष करण्यात आला. तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभूराम यांचे लवकरच भव्य दिव्य मंदिर अस्तित्वात येईल अशी कामना उपस्थितांनी केली. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष भाऊराव बारकू पाटील, पहूर पेठ चे सरपंच सौ.नीताताई पाटील, माजी जि. प. सदस्य. राजधर पांढरे, सरपंच पती रामेश्वर पाटील, ईश्वर देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल अनिल देवरे यांचेसह नागरीक उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.