GM NEWS, धार्मिक वृत्त : कोरोना संसर्गामुळे जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी महाराजांचा ९६२ वा स्मृती महोत्सव रद्द . भाविकानी नोंद घेण्याचे आयोजकांचे आवाहन .

0
78

पहूर, ता.जामनेर ( शंकर भामेरे ) बुलढाणा जिल्ह्य़ातील साखरखेर्डा येथील पलसिद्ध महास्वामी यांचा ९६२ वा स्मृती महोत्सव कोरोना सारख्या महाभयंकर आकारामुळे रद्द करण्यात आला आहे. भाविकांच्या सोईसाठी पलसिद्ध संस्थान या वेबसाईटवर ऑनलाइन महापूजा व आरतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. महोत्सवातील महापूजा भाविकांना ऑनलाइन अनुभवता येणार असल्याची माहिती संस्थानचे उत्तराधिकारी नीळकंठ स्वामी यांनी जी. एम. न्युज शी बोलताना दिली.
दरवर्षी श्रावण महिन्यातील चतुर्थीला पलसिद्ध मठात जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी महाराजांचा स्मृती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी ९६२ वा स्मृती महोत्सव ६, ७ व ८ ऑगस्ट ला साजरा होणारा हा महोत्सव कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे रद्द करण्यात आला आहे. या स्मृती महोत्सवास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारो वीरशैव लिंगायत सांप्रदायिक भाविक सहभागी होतात.
शेकडो दिंड्यांचे आगमन आणि गावातील पालखी सोहळ्याने याठिकाणी भक्तांचा महापूर पहावयास मिळतो. यावर्षी कोरोना सारख्या संसर्ग जन्य आजारामुळे हा नयनरम्य सोहळा भाविक भक्तांना पहावयास मिळणार नसला तरी जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांची महापूजा आणि आरतीचे ऑनलाईन बघता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा रद्द करण्यात आल्याने भाविकांची अनेक वर्षांपासून ची परंपरा खंडित होणार आहे. श्री. पलसिद्ध महास्वामी यांची महापूजा मठाधिपती श्री. सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते आणि मठाचे उत्तराधिकारी नीळकंठ स्वामी व सोमनाथ स्वामी यांच्या मंत्रोच्चारात होणार आहे. कोरोना सारख्या महाभयंकर आजारामुळे हा निर्णय घेतला आहे.