GM NEWS, कृषी वृत्त: काळवीटांच्या द्वंद्वात ( भांडणात ) शेतकऱ्याच्या कपाशीसह ठिबक सिंचनच्या नळ्यांचे नुकसान . जामनेर तालुक्यातील ढालगाव शिवारातील घटना . शेतकऱ्याच्या कौशल्याने मिळाले दोन काळवीटांना जीवदान . सुटका होताच काळवीटांनी जंगलाच्या दिशेने ठोकली धूम .

0
1168

तळेगाव ता. जामनेर दि ५ ( डॉ. गजानन डी . जाधव ) :- जामनेर तालुक्यातील ढालगाव शिवारात दोन काळवीटांच्या द्वंद्वात( भांडणात ) शेतकऱ्याच्या कपाशी पिकाचे व ठिबकच्या नळ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .वन विभागाकडून नुकसान भरपाई मिळावी , अशी मागणी संबंधित शेतकऱ्याकडून करण्यात आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , तोंडापूर परिसराला लागून अजिंठा डोंगर रांगा असून या भागात हरीण , काळवीट, नीलगाय ,रानडुक्कर या वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे .
तोंडापूर परिसरातील ढालगाव येथील शेतकरी विठ्ठल गणपत पाटील यांच्या ढालगाव शिवारातिल गट क्र ५२ /५ या शेतात सुरेश पाटील हे सकाळी शेतात गेले असता दोन काळवीट या वन्यप्राण्यांचे द्वंद्व सुरु असल्याचे त्यांना दिसले . सुटका करण्यातसाठी उड्या मारून दोघकाळवीट प्रयत्न करत होते मात्र एकमेकांच्या शिंगांमध्ये ठिबकच्या नळ्या अडकल्याने त्यांची पकड अधिकच घट्ट झाली होती .शेवटी आसपास शेतकऱ्यांच्या मदतीने संबंधित शेतकरी सुरेश पाटील , प्रवीण जोशी ,आत्माराम जोशी यांनी ठिबक सिंचनच्या नळ्या विळ्याने कापून काळविटांना कोणतीही इजा होऊ न देता अतिशय कौशल्याने व सावधगिरीने काळवीटांची सुटका केली . सुटका होताच दोन्ही काळवीट जंगलाच्या दिशेने सुसाट वेगाने पळाले .शेतातील ठिंबकच्या नळ्यात शिंगे अडकून ते शेतात सैरावैरा पळल्याने सुमारे दिड एकरच्या आसपास कपाशीच्या पिकाचे व काळविटांच्या शिंगात अडकलेल्या नळ्यात गुंतागुंती झाल्यामुळे त्यांना सोडवताना शेतकऱ्यांना नळ्या कापाव्या लागल्या .परिणामी नळ्यांचेही नुकसान झाले .नळ्या कापल्याने दोन्ही काळवीटांना जिवदान मिळाले आहे .शेतकऱ्यांच्या हुशारीने काळवीटांचा जिव वाचवण्यात यश आले . शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .झालेल्या प्रकारा बाबतीत वनविभागाचे कर्मचारी समाधान धनवट यांना माहिती देण्यात आलीे . कपाशी पिकासह ठिंबकच्या नळ्यांचे नुकसान झाले असून वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी , अशी मागणी सबंधित शेतकऱ्या कडून करण्यात आली आहे .
या परिसरात सध्या हरीण व निलगाय या प्राण्यांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने वनविभागाच्या वतीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .