तोच देश महान , जिथे शिक्षकाला बहुमान .

0
85

तोच देश महान,जिथे शिक्षकाला बहुमान-

५ सप्टेंबर डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन होय.तो आपण “शिक्षक दिन” म्हणुन साजरा करतो.शिक्षक म्हणजेच गुरु होय.प्राचीन गुरु- शिष्य परंपरा आठवते.एकलव्याच्या गोष्टी सर्वञ सांगतात.पण द्रोणाचार्यासारख्या गुरुविषयी मान ठेवावा कि नाही.हा प्रश्न माञ अनिर्णयित आहे.कारण गुरुने आपल्या शिष्याविषयी भेद न करता सर्वांना समान
वागवावे.अर्जुनाला श्रेष्ठ ठरविण्यासाठी एकलव्याचा अंगठा घेणा-या गुरुविषयी आजचा चिकित्सक शिष्य माञ खडा सवाल विचारल्याशिवाय राहणार नाही.काही शाळांमधुन या गोष्टीची प्रचिती कधी कधी येते.म्हणुन आजच्या शिक्षण पध्दतीत शिक्षकांची प्रमुख भुमिका आहे.केवळ अध्यापन,तास घेणे आणि नियोजनानुसार शालीय काम करणे.यात धन्यता न मानता किंवा पगाराच्या अपेक्षेने काम करणे.शिक्षण क्षेञाला ही लागलेली किडच ठरेल.शिक्षकाने स्वत:ला परिपुर्ण बनविले पाहिजे.आदर्श संस्कार,नैतिक मूल्यांची जोपासना करणे आवश्यक आहे.स्वत:च्या नैतिकतेची बैठक भक्कम ठेवली पाहिजे.

शिक्षण हे जीवनाभिमुख असायला हवे.ही काळाची गरज आहे.तसेच शिक्षण कधी ही न संपणारी प्रक्रिया आहे.कारण शिक्षक हा राष्टाचा खराखुरा शिल्पकार आहे.विद्यार्थ्यांच्या जीवनात शारीरिक,बौध्दीक,आत्मिकशक्तीचे,मूल्यांची जोपासना,कलेचा विकास याचा विकास शिक्षकाने केला पाहिजे.आज शिक्षकाने शिक्षणातुन खरा संस्कारक्षम माणूस बनविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

समाजाचा प्रगत विकास हा यंञाने किंवा सत्तेने न होता.आदर्श शिक्षकांमुळे होत असतो.त्यामुळे शिक्षण व्यवस्था,त्याची विद्यार्थ्यांसाठी असणारी प्रणाली,शिक्षकाला बनविते.पण त्यातुन खरा विद्यार्थ्यांसाठी धडपडणारा शिक्षक हा एक जीवन याञीच ठरतो.शिक्षण माणसाला वळण लावते.पण ते केव्हा योग्य वळण देण्याचे ते शिक्षक,पालक यांनी जाणीवपुर्वक सांगितले पाहिजे. मुलांचे ज्ञान आणि शीलसंवर्धन करणारा शिक्षक स्वत: चारिञ्यसंपन्न असायला हवा.”अधि आचरिले,मग सांगितले” असे असेल.तरच त्या शिक्षकाचे स्वत:चे आचरण त्या विद्यार्थ्यांना आदर्शवत वाटुन प्रेरणादायक ठरते.

जर विद्यार्थी शिक्षकाला मान,सन्मान देत नसतील.तर तो विद्यार्थ्यांचा काही दोष नसुन,त्या शिक्षकाच्या अंगी असणा-या दोषांचा परिणाम आहे.कारण मान देण्याइतकी शिक्षकाची ही मान उंच राहीली पाहिजे.मान,सन्मान हा मिळवायचा असतो.त्याची याचना,मागणी करायची नसते.नव्या पिढीच्या वाढत्या जबाबदा-या नागरिकत्वाच्या धुरा शिक्षकावरच आहे.खराखुरा हाडाचा शिक्षक होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना शोधुन काढण्यासाठी सदैव प्रयत्नशील असायला हवे.मुले ही
अनुकरण प्रिय असतात.म्हणुन त्याच्यासमोर चांगलाच आदर्श राहील असे करा.मुले ही फुलासारखी असतात.ती टिकेने अगर निंदेने कोमेजणार नाही.त्यांची काळजी घ्या.मुलांना सहानुभूतीची भूक असते.प्रेमाची तहान असते.कौतुकाची चाड असते.

निस्वार्थी शिक्षकाने असायला हवे.आवडीने अंगीकारलेल्या सामाजिक कामातुन लाभाची अपेक्षा ठेवू नये.निस्वार्थीपणे काम करण्यातच खरा आनंद सामावलेला आहे.कामाच्या धकाधकीतुन सवड काढुन,भरपुर आवडीचे ग्रंथ वाचा.आवडणारी पुस्तके विकत घेऊन स्वत:चे लहानसे ग्रंथालय उभे करा.वेळेचा सदुपयोग करा.

सरकारने एवढे माञ विसरु नये,कि उद्याचा समाज,राष्ट,देश,भावीपिढी या शिक्षकाच्या हातीच घडणार आहे.या शिक्षणाचे प्रतिबिंब त्याच्यात दिसणार आहे.शिक्षण क्षेञावर प्रगत देश जास्त वेळ,पैसा खर्च करतात.म्हणुन ते देश अतिप्रगत आहे.पण आपल्या देशाची विचारधारा,शासकीय योजना या उलट अप्रगत आहे.म्हणुन उद्याचा प्रगत भारत देश भारताचा नागरिक कसा असेल याचे पुसटचशे चिञ आज कळल्याशिवाय राहणार नाही..!शिक्षकाजवळ पंचनिष्ठा असावी.त्यात विद्यार्थीनिष्ठा,समाजनिष्ठा,व्यावसायिकनिष्ठा,विज्ञाननिष्ठा,देशनिष्ठा होय.शिक्षकांनी नेहमीच दुस-याला प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व व्हावे.

शिक्षक देशाचा आधारस्तंभ निर्माण करणारा उत्तम कलाकार आहे.त्याला मान द्या.त्याची शान वाढवा.म्हणजेच देशाचा आभिमानाचा बाणा रुजु द्या.देश ही बलशाली होऊ द्या…!हाच खरा शिक्षक दिनाच्या विषयी विचार करावा वाटतो.

शिक्षणतज्ञ राजेंद्र दशरथ सोनवणे.
कवी-वादळकार,पुणे
९६५७३४८६२२.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here