GM NEWS, शैक्षणिक वृत्तः जामनेर तालुक्यातील पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या संरक्षण भिंतींचे भूमिपूजन . ५५ लाखांचा निधी उपलब्ध . खर्चाणे येथील शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम प्रगतीपथावर .

0
620

पहूर , ता . जामनेर दि. ८ ( शंकर भामेरे ) : –

जामनेर तालुक्यातील पहूर पेठ गृप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे भुमीपुजन पहूरपेठच्या लोकनियुक्त सरंपच निताताई रामेश्वर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पहूर पेठ ग्राम पंचायत अंतर्गत ४५ लाख रुपयांच्या निधीतून शाळा संरक्षण भिंती उभारण्यात येत आहेत त्याचे भूमिपूजन आज शुक्रवारी झाले . प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख , माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदिप लोढा ,माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , पहूर कसबेचे उपसरपंच योगेश भडांगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर तडवी, उपाध्यक्ष अर्जुन जोगी, सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर पाटील , शाळेचे मुख्याध्यापक भास्कर बुवा , माजी उपसरपंच राजू पाटील , अशोक घोंगडे , ग्राम विकास अधिकारी टेमकर भाऊसाहेब ,चांदखा तडवी , कडूबा पाटील , अरुण घोलप , ईश्वर देशमुख यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .