सभापती पुरस्कृत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न .

0
200

चाळीसगांव दि .६ ( गोविंद गुंजाळ सर ) : -चाळीसगाव येथील राजपूत समाज मंगल कार्यालयाच्या भव्य सभागृहात पंचायत समितीच्या वतीने 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी चाळीसगाव पंचायत समितीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळे मधील केंद्रनिहाय, आश्रम शाळा, माध्यमिक शाळेतील शिक्षक नगरपालिका शाळा मधील मुख्याध्यापक, शिक्षक बंधू-भगिनींना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला .या पुरस्कारासाठी उपस्थित हजारो शिक्षक बंधूंनी समाधान व्यक्त केले व सभापतींचे अभिनंदन केले .याप्रसंगी 190 शाळेच्या मुख्याध्यापकांना सन्मानित करण्यात आले .तसेच 30 आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात  आले.तालुक्याचे भूमिपुत्र असलेले व सातत्याने शिक्षण व समाज व्यवस्थेसाठी शासकीय योजना तळागाळात पोहचविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात पुढाकार घेणारे राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझर करयांनाही विशेष निमंत्रित करून त्यांचा पंचायत समितीच्या सभापती स्मीतल बोरसे, दिनेश बोरसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पाणी फाउंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेमध्ये तालुक्यातील 76 ग्रामपंचायती मधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री के बी दादा साळुंके यांना देण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून सौ संपदा ताई उन्मेश पाटील, पंचायत समिती सदस्य अजय पाटील, भाऊसाहेब पाटील, सुभाष पाटील, विष्णु चकोर सर, शिवाजी सोनवणे सर पियुष साळुंखे, माजी जिप सदस्य साहेबराव तात्या साळुंके, नगरपालिका गटनेते संजू आबा पाटील, राज्य शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्यसमन्वयक तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर, , बीडिओ अतुल पाटील साहेब गटशिक्षणाधिकारी विलास भोई साहेब, शिक्षक संघटना चे विविध पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न जी राज्यस्तरावर आहेत ते शासनाने लवकरात लवकर सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा तसेच शिक्षणाची उदिष्ट माणूस निर्माण करणे असून शिक्षक देखील माणूस आहे त्यांना समजून घेण्यासाठी गाव पातळीवर व जेथे असेल तेथे जिल्हा परिषद व इतर शाळांच्या शिक्षकांना सर्वांनी जीव लावावा आपला देश समृद्ध व महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असे म्हटले .पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे पुरस्कार घेताना अश्रू अनावर झाले अनेक शिक्षकांनी सपत्नीक सत्कार स्वीकारला इकार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी विलास भोई शिक्षण विस्ताराधिकारी आर डी महाजन सर्व केंद्राचे केंद्रप्रमुख सर्व संघटनांचे पदाधिकारी शिक्षण विभागातील व पंचायत समितीतील सर्व खात्यांचे कर्मचारी अनेक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले व् शासनाच्यावतीने कोणतेही अनुदान न घेता सभापती सौ स्मितल बोरसे, व माजी पंचायत समिती सदस्य दिनेश भाऊ बोरसे यांनी स्वखर्चातून कार्यक्रम यशस्वी केला. सौ स्मिता ताई बोरसे, सौ संपदा ताई पाटील, नगरपालिकेचे गटनेते संजय अबा राजपूत, दिनेश बोरसे गट विकास अधिकारी अतुल पाटील , निकम सरआदींनी मनोगतातून शिक्षक व शिक्षणाविषयी गौरव व्यक्त केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष केबी दादा साळुंखे यांनी आदर्श शिक्षक व सर्व शिक्षक भरती समाजात कायम आदरभाव असून अशा कार्यक्रमाने तालुक्याची उंची वाढल्याचे म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भैय्यासाहेब वाघ सर यांनी केले तर सर्वांचे आभार पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या ऐतिहासिक कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here