GM NEWS, अभिनंदनिय वृत्त : पहूरच्या सुमित बोरसे याने एस.एस. सी. परीक्षेत विशेष प्राविण्यासह घवघवीत यश प्राप्त करून ,गावाला प्राप्त करून दिला सन्मान . वैद्यकिय क्षेत्रात करीयर करण्याचा व्यक्त केला मानस .

0
94

पहूर , ता जामनेर दि .१ २( शंकर भामेरे ) :- पहूर येथील युनिटी पॅथॉलॉजी लॅबचे संचालक डॉ. रवींद्र विनायक बोरसे यांचे चिरंजीव, व आर . टी .लेले हायस्कूलचे शिक्षक श्री. विजय बोरसे सर यांचा पुतण्या सुमित रवींद्र बोरसे याने मार्च2020 मध्ये झालेल्या एस. एस. सी. परीक्षेत शे.92 (92%)गुण मिळवून सुयश प्राप्त केले आहे. तो न्यू इंग्लिश स्कूल जामनेरला सेमी माध्यमातून शिकत होता. पुढे भावी आयुष्यात आपल्या मोठ्या बहिण व भावाप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात एम. बी. बी.एस.करण्याचा त्याचा मानस आहे.
सुमित याने प्राप्त केलेल्या या सुयशाबद्दल त्याचे जामनेरच्या न्यू इंग्लिश परिवार, कडून, आप्त स्वकीयांकडून, स्नेही मित्र परिवाराकडून, पहुर परिसरातून सर्वत्र त्याचे कौतुक होऊन, त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आणि त्याला भावी जीवनाच्या यशस्वीते करिता ही असंख्य शुभेच्छा प्राप्त होत आहेत. GM NEWS परिवारातर्फे सुमित बोरसे याचे हार्दिक अभिनंदन .