माणुसकी जपणारे रेल्वे गेटमन सुहास पाटील यांचा आ . राजुमामा भोळे यांनी केला सन्मान .

0
91

जळगांव ,दि.६ ( एकनाथ शिंदे ) : – जळगाव शहरातील सत्यवल्लभ हॉल मध्ये शिक्षक दिनानिमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात शहरातील नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते तथा प्रिंप्राळा रेल्वे गेटमन श्री. सुहास चंद्रविलास पाटील यांचा आ . राजुमामा भोळे यांच्या हस्ते शाल व पुस्तक देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.या आधी देखील अनेक वेळा सुहास पाटील यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आ. भोळे यांनी त्यांचा गौरव केला आहे.पाटील हे शहरातील प्रिंप्राळा रेल्वे गेटवर गेटमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंतअनेकांना आत्महत्या करण्यापासून वाचविले आहे यासंदर्भात त्यांना गेल्यावर्षी रेल्वे प्रशासनाकडून अवार्ड देवून गौरविण्यात आले आहे.यासह अलीकडेच दि.४सप्टेंबर१९ रोजी गेटवर ड्युटी करीत असताना अप डाउन रेल्वे लागलेली असताना एक महिला अचानक पणे दोन्ही रेल्वे ट्रॅक मध्ये येवून उभी राहिली व पाटील यांनी त्यांच्या सहकारी चाबिदार युनूस याच्या मदतीने लाईनीतून ओढून काढले व वयोवृद्ध महिलेला जीवनदान दिले.शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रियपणे सहभागी असतात.यासंदर्भात त्यांना अनेक सामाजिक संस्था व संघटने कडून पुरस्कार मिळाले आहेत.सुहास पाटील हे मुळचे जुने जळगावचे असल्याने व शालेय शिक्षण विवेकानंद प्रतिष्ठान व महाविद्यालयीन शिक्षण एम. जे.कॉलेज व डी. एन.सी.व्ही. पी.समाजकार्य महाविद्यालयात एम. एस. डब्ल्यू. झाल्याने त्यांची शहरात ओळख भरपूर प्रमाणात आहे.एन. एस.एस.,एन.सी.सी.,वक्तृत्व, वादविवाद या व अशा अनेक उपक्रमात त्यांना पारितोषिके मिळाली आहेत.भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र जळगाव येथे दोन वर्षे स्वयंसेवक, विवेकानंद केंद्र जळगाव चा पाच वर्षे स्वयंसेवक म्हणून कार्य केले आहे. त्यात त्यांचा मदतीला धावून जाणारा स्वभाव,निर्व्यसनीपणा व अजातशत्रू व्यक्तिमत्त्वामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ही खूप लोकप्रिय झाले आहेत.

*जळगांव महानगरातील  बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : – एकनाथ शिंदे ( जळगांव महानगर प्रतिनिधी , मो .7385733112)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here