मुंबई दि .६ ( गौतम वाघ ) : – ज्या आईने नऊ महिने पोटात ठेऊन जन्म दिला शिक्षण दिल स्वतः उपाशी राहुन ज्या मुलास खाऊ घातला मोठा केला त्याच मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली, माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना कल्याण पश्चिमच्या भोईवाडा भागात घडली आहे.
शुल्लक कारणावरून एका सटकी मुलाने आपल्या आईची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अमन हसन मुल्ला असे या मुलाचे नावआहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, आरोपी अमन हसन मुल्ला याची पत्नी माहेरी गेली होती आणि ती पुन्हा आपल्या सासरी परत येणार होती यावरून आरोपी आणि त्याची आई या दोघांचे बोलणे चालू होते या बोलण्यात आरोपीच्या आईने ‘ती कशी येईल खूप पाऊस आहे’ असे म्हटले परंतु आपल्या आईचे हे बोलणे काही आरोपीला पटले नाही त्याला त्याचा राग आला आणि त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील कुकर, छत्री, ब्रश, लाटणे अशा मिळेल त्या वस्तूने आपल्या आईवर प्राणघातक हल्ला करून हत्या केल्याचे प्राथमिक माहितीत समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.तसेच आरोपी हा कोणताही काम धंदा करत नसून या आधीही या माय लेकात भांडण होत असल्याचे तक्रारदार याने म्हटले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे.