“कोरोना कहर मध्ये भारतीय अर्थव्यवस्था एक सत्य “

दि .१९ ऑगस्ट २०२०
आज कोरोना या महामारीने सर्व जग ग्रासले आहे . त्यांचा परिणाम सर्व जगात लॉक डाऊन आहे . याही असामान्य परिस्थितीत भारतीय रिझव्ह बँकेने जागतीक बाजारातील शुध्द सुवर्ण मोठया प्रमाणात खरेदी केले . त्याचा परिणाम भारतातील सुवर्ण किंमती प्रति तोळा सामान्य आहे तर विदेशातील प्रति तोळा किंमती १ लाख रू. प्रति तोळा गगणात भिडलेल्या आहे .
आज सर्वत्र आर्थिक मंदीची स्थिती आहे . सर्व उद्योग ,व्यवसाय , दळणवळण बंद आहे . आर्थीक विकासाचा जागतिक दर शुन्य आहे . या अवस्थेमध्ये सोन्याचे दर वाढत आहे . शेअरचा किमती कमी होत आहे आणि विदेशी चलन दर सतत वाढत आहे . कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये ” रूपयापुढील समस्या , उगम व उपाय ” हा संशोधनात्मक ग्रंथ ” डि.एससी ” या सर्वोच्च पदवीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स अॅन्ड पॉलॉटिकल सायन्स, या जगप्रसिद्ध विश्वाविदयापीठ, लंडनमध्ये लिहला होता . यात त्यांनी ” सुवर्ण विनिमय चलन पध्दती ” नष्ट करावी कारण सुवर्ण हा मौल्यवान धातू आहे . आणि त्याजागी ” कागदी विनिमय चलन पध्दती ” देशात कार्यान्वीत कारावी , ती देशाचा आणि जगाचा विकास करील, यासाठी कागदी चलननिर्मितीची कायदेशीर शास्त्रीय पद्धती विस्तृतपणे दिलेले आहे . या ग्रंथामधील कागदी चलन निमिर्तीच्या शास्त्रीय उपायामुळे जागतीक अर्थव्यवस्थेला महामंदीतुन बाहेर काढले आणि आर्थिक विकास घडवून आणला .

जागतीक आर्थीक विकास करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कागदी विनिमय चलन ( पैसा ) तयार करण्याचे सुत्र सांगितले आहे . या सूत्रामध्ये ‘ शुद्ध सुवर्ण , शेअर्स आणि विदेशी चलन सम प्रमाणात रीझव्ह बँक स्वतःकडे ठेऊन त्या प्रमाणात कागदी चलनाची निर्मिती मोठ्या प्रमाणात सतत करू शकते . यासाठी सरकारची सहमती आवश्यक आहे “

आजही जगातील प्रत्येक देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थीक विकासाच्या सुत्राप्रमाणे कागदी विविमय चलनाची निर्मिती करीत आहे . त्यामुळे जागतीक स्थरावर सोन्याचे भाव सतत वाढत आहे . शेअर्सच्या किमती सतत कमी होत आहे आणि विदेशी चलन व्यवहार काही प्रमाणात स्थीर असलेल दिसून येतात.

सर्वसामान्य व्यक्तीला प्रश्न पडला असेल की , सर्व उदयोग , व्यवसाय , दळणवळण बंद असून सुद्धा केंन्द्र आणि राज्य कर्मचाऱ्यांचे पगार कस होतात, सर्वसामान्य माणसाच्या हाती पैसा कसा खेळत आहे . बँका आपले व्यवहार शांतपणे कशा करीत आहे . याचे उत्तर , म्हणजे डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचे कागदी विनिमय चलन सुत्र आणि रीझव्ह बँकेची धोरणे होय .

आपल्या देशातील उत्पन्नाचे एकमेव साधन म्हणजे “कर “होय . पुढील काळात कर धोरण काही प्रमाणात बदलणार आहे . उदयोग , व्यवसाय , पगारदार वर्गावर कर जास्त प्रमाणात राहणार आहे . शेत मालाचे , खादय पदार्थांचे भाव सतत वाढणार आहे .बाजारात वस्तू मोठ्या प्रमाणात आहे .परंतु , ग्राहकांच्या खिशात पैसेच नाही कारण रोजगार नाही .

सर्व सामान्य माणूस आपले फिरकोळ आर्थिक व्यवहार चांगल्या प्रकारे चालवत आहे . कारण भारतामध्ये केंन्द्र आणि राज्य सरकार स्थीर आहे . त्यामुळे देशातील आर्थीक स्थिती आशावादी आहे . या जागतिक महामंदीच्या स्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थीक विचार आणि त्यानूसार दूरदृष्टीने टाकलेले पाऊल भारताला जागतिक महासत्ता बनवेल असे वाटते .

लेखक – प्रा.डॉ. अवथरे जयेश. ( एम.ए. , एम. फिल. ,नेट , पीएच.डी.  अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पीएच.डी. मार्गदर्शक )
मो – 9923286385