राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन .

0
139

 

जळगाव, दि. 7 ( एकनाथ शिंदे ):- राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी महसुल प्रशासन रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी पुनर्वसन श्रीमती शुभांगी भारदे,जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी, लेखाधिकारी श्री. डी. पी. वानखेडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 7 =