*GM NEWS, नोकरी-व्यवसाय मार्गदर्शन वृत्त :* *महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या* *योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन*

0
333

जळगाव, दि. 20 ( मिलींद लोखंडे ) :-
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत लघु उद्योग व व्यवसायांकरीता कर्ज पुरवठा केला जातो. त्या अनुषंगाने सन 2020-21 या वित्तीय वर्षाकरीता विविध योजनांचे जळगाव जिल्ह्याकरीता उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. या मध्ये 20% बीज भांडवल योजना व एक लाखापर्यत थेट कर्ज योजना तसेच ऑनलाईन योजनेमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा व गट कर्ज व्याज परतावा या योजनांचा समावेश आहे. एक लाखांपर्यत थेट कर्ज योजनेकरीता अर्जदारांचा सिबील स्कोअर हा किमान 500 असणे बंधनकारक आहे. ऑनलाईन योजनेसाठी महामंडळाच्या msobcfdc.org या वेबसाईटवर नोदणी करुण अर्ज भरता येईल याची नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय, सामाजिक न्याय भवन, मायादेवी शनि मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव दुरध्वनी क्रमाक 0257-2261918 येथे संपर्क साधावा. असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.