औरंगाबाद, दि .७(प्रतिनिधी) – वंचित बहुजन आघाडी सोबत केलेल्या युती मुळे लोकसभेला निवडून आलेले एमआयएमचे खासदार ईमतियाज जलील यांची औवेसी यांनी पक्षातून हकालपट्टी करण्याचे संकेत दिलेले आहेत असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
लोकसभेला ईमतियाज जलिल निवडून आल्यानंतर खा.औवेसी यांनी एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी जलील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
जलील यांचे स्वःपक्षातील इतर नेत्या सोबत बिघडलेले संबंध , पक्षाअंतर्गत वाद तसेच वंचित बहुजन आघाडी सोबत युती तोडण्याचा निर्णय परस्पर व न कळवता घेतल्यामुळे खा.औवेसी हे ईमतियाज जलील यांच्या मनमानी कारभारावर नाराज असून एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करणार असल्याचे औरंगाबाद मधील औवेसी यांच्या जवळच्या नेत्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.
खा. ईमतियाज जलील यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युती तोडण्याच्या निर्णयाला मुस्लिम समाजातून तीव्र विरोध होत आहेत.
Conf News.