पहूरच्या फुले विद्यालयात ‘इंग्लिश डे ‘ चेस प्रकल्पामुळे विदयार्थी इंग्रजी बोलू लागले.

0
232

पहूर,ता.जामनेर,७( संतोष पांढरे ) : – येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शनिवारी इंग्लिश डे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला . अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही .व्ही. घोंगडे या होत्या . वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे इंग्रजीतून संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण केले .

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत गेल्या दोन वर्षांपासून राज्यभरात प्रादेशिक विदया प्राधिकरण औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शाळांमध्ये चेस प्रकल्प राबविण्यात येत आहे . या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील इंग्रजी भाषेद्दल आत्मविश्वास वाढत आहे . दर शनिवारी इंग्रजी दिवस साजरा केल्याने मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी इंग्रजी बोलू लागले आहेत .
आज ( ता. ७ ) झालेल्या कार्यक्रमात श्वेता सोनवणे, अमृता सोनवणे, प्रेरणा भोंडे, आर्शिया शेख, पल्लवी घाटे, प्रथमेश लहासे, वेदांत क्षीरसागर, देवेश सोनवणे , कुश उभाळे, पवन बावस्कर , भुषण मगरे , सौरभ द्राक्षे, प्रथमेश क्षीरसागर , आकांक्षा जाथव , दिक्षा खरे , अनिकेत जाथव , जीवन बनकर आदी विद्यार्थ्यांनी गोष्ट , सुविचार, दिनविशेष, प्रेरणा गीत , स्वागत गीत , शब्दांची जादू, संभाषण , मुलाखत आदी उपक्रम सादर केले .
यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .व्ही. घोंगडे विदयार्थ्यांचे कौतूक केले . त्यांचे आर .जे. चौधरी यांनी स्वागत केले ,बी.एन जाधव , एच .बी. राऊत यांनी मार्गदर्शन केले . यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख शंकर भामेरे यांचा राज्यस्तरीय चेस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला . सुत्रसंचालन पियुष मगरे याने केले तर प्रथमेश लहासे याने आभार मानले . यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी , विदयार्थ्यांचे सहकार्य लाभले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + sixteen =