GM NEWS, आंदोलन वृत्त : महाराष्ट्र राज्यातील धोबी जातीला पुर्ववत आरक्षण लागु व्हावे म्हणुन जामनेर तहसिलदारांना निवेदन .

0
224

जामनेर, दि.२६ ( मनोज दुसाने ) : -महाराष्ट्र राज्यातील धोबी जातीला भारतातील १७ राज्ये व ५ केंद्रशासित प्रदेशात लागु असल्या प्रमाणे अनुसुचित जातीचे आरक्षण पुर्ववत लागु व्हावे . आमच्या समाज संघटनेच्या वतीने गेल्या २५-३० वर्षा पासुन शासन स्तरावर लढा सुरू असुन राज्य सरकारकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा सुरु आहे . महाराष्ट्रातील धोबी जातीला अनुसुचित जातीत समाविष्ठ करण्यासाठी सन २००१ मध्ये शासनाने नेमलेल्या डॉ .दशरय भांडे यांच्या अध्यक्षेत भंडारा, व बुलढाणा जिल्ह्यात १९५७ पुर्वी अनुसुचित जातीचे आरक्षण लागु केले होते . त्याच प्रमाणे धोबी जातीतील सामाजिक, आर्थिक, शैक्षणीक, व राजकीय परीस्थीती पाहता या समाजाला इतर राज्यांप्रमाणे आरक्षण लागु करण्यात यावे . म्हणुन आज अखिल भारतीय धोबी महा समाज व महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळ, राष्ट्रसंत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था जामनेर यांच्या वतीने मा . तहसिलदार श्री . अरुण शेवाळे यांना समाज बांधवांनी मागणी साठी निवेदन देण्यात आले . त्यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री . सुनिल रघुनाथ नेरकर, योगेश देविदास परीट, अनिल श्रावण शिरसाठ, विनोद साहेबराव इंगळे, सुनिल श्रावण शिरसाठ, रामकृष्ण टेलर आदी समाज बांधव उपस्थित होते.