GM NEWS, FLASH: जामनेर तालुक्यातील पहूर येथे म्हशीने दिला दोन पारडूंना जन्म . सचिन नंदकिशोर चौधरी गेल्या पंधरा वर्षांपासून करत आहेत शेतीला जोडधंदा म्हणून पशूपालन .

0
412

पहूर ता जामनेर दि . २६( शंकर भामेरे ) : – जामनेर तालुक्यातील पहूर येथील शिवनगर मध्ये राहणाऱ्या सचिन नंदकिशोर चौधरी यांच्या म्हशीला दोन पारडू झाले आहेत .आश्चर्याची बाब म्हणजे २ महिन्यापूर्वी त्यांच्या गाईनेही दोन पिलांना जन्म दिला आहे .
पहूर पेठ येथील शिवनगर भागात राहणारे पशुपालक सचिन नंदकिशोर चौधरी हे गेल्या पंधरा वर्षांपासून गाई-म्हशी पालनाचा शेतीला पूरक व्यवसाय करत आहेत . यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे . शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन आणि दुग्धोत्पादन यातून त्यांनी उन्नती साधली आहे .नुकतेच त्यांच्या म्हशीने दोन पारडूंना ( वगारी ) जन्म दिला . एरवी म्हशीला एकच पारडू होते, मात्र म्हशीला दोन पारडू होण्याच्या घटना अगदीच क्वचित असतात , असे मत गेल्या पन्नास वर्षांपासून पशुपालनाचा व्यवसाय करणारे तसेच गजानन दूध डेअरीचे संचालक भागवत त्र्यंबक घोलप यांनी GM NEWS शी बोलतांना व्यक्त केले . म्हशीने दिलेल्या दोघं पारडूंना पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी चांगलीच गर्दी केली होती .