GM NEWS, दिलासादायक वृत्त: राज्यातील ई-पासची अट रद्द,एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करता येणार . राज्यात १ सप्टेंबर पासून काय सुरू काय बंद राहणार ? सविस्तर जाणुन घेण्यासाठी खालील बातमी पुर्ण वाचा .

0
2052

मुंबई,दि. 31, ऑगस्ट ( मिलींद लोखंडे ) : –

राज्यातील ठाकरे सरकारने अखेर राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास राज्य सरकारने रद्द केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही. राज्य सरकारने आज मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊन मधील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मिशन बिगेन अगेमच्या चौथ्या टप्प्यात हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.मात्र मेट्रो, सिनेमागृहे बंदच राहणार आहेत.

गेल्या मार्च महिन्यापासून असलेली जिल्हा बंदी अखेर राज्य सरकारने उठवली आहे.

राज्य सरकारने आज मिशन बिगेन अगेन अंतर्गत येत्या ३० सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवतानाच राज्यातील सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे.राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास राज्य सरकारने रद्द केला आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी परवानगी लागणार नाही.याची अंमलबजावणी आज रात्रीपासून होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार,हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत.राज्य सरकारने चौथ्या टप्प्यात काही सवलती दिल्या असल्यातरी मात्र मेट्रो,सिनेमागृहे बंदच राहणार आहेत. तर मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.खासगी तसेच मिनी बसेसना परवानगी देण्यात आली असली तरी शाळा,कॉलेज,शैक्षणिक संस्था येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहे. स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क, बार, सभागृह यांच्यावरील बंधने कायम ठेवण्यात आली आहेत.

काय सुरू राहणार

प्रवासासाठी ई-पासची अट रद्द
राज्यातील हॉटेल आणि लॉज १०० टक्के सुरु होणार
१ सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट
खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा
२ सप्टेंबरपासून अनावश्यक दुकाने सुरु
दारुची दुकाने सुरु राहणार
मुंबई आणि एमएमआर मध्ये शासकीय कार्यालय ३० टक्के क्षमतेने सुरु
राज्यात शासकीय कार्यालयात ५० टक्के कर्मचारी उपस्थिती

काय बंद राहणार

३० सप्टेंबरपर्यंत शाळा-कॉलेज बंद
मेट्रो आणि सिनेमागृहे बंद राहणार आहेत
कंटेनमेंट झोनमध्ये ३० सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
३० सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
मंदिरे आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
कोचिंग क्लास ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत
स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क,मॉल्समधील थिएटर,बार,ऑडिटोरिअम बंदच राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
मेट्रो ट्रेनही बंद ठेवल्या जाणार आहेत .
साभार : मुंबई नगरी टीम .