क्रीश छाजेड याचा वाढदिवस विधायक कार्यक्रमांनी साजरा .

0
335

वाकोद , दि. ८ ( संतोष पांढरे ] : – जि.प.प्राथ.शाळा,कुंभारी खुर्द येथे “शिक्षक दिन” निमित्त,तसेच वाकोद येथील रहिवासी श्री.किशोर छाजेड यांचे नातू तथा श्री.कमलेशभाऊ छाजेड यांचे चि. “क्रिश” याचा १ ला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .आपण समाजातील वंचित,गोरगरीब मुलांसाठी काहीतरी केले पाहिजे या प्रेरणेने वाढदिवसावर कुठलाही थाटमाट न करता गोरगरीब मुलांना आनंद वाटेल त्यासाठी छाजेड परिवाराकडून शालेय विद्यार्थ्यांना कचोरी,गुलाबजाम,सोनपापडी,चॉकलेट,बिस्कीट पुडे, तसेच प्रत्येक मुलाला वही,पेन वाटप करण्यात आले .

सदर कार्यक्रमाला छाजेड परिवातील सर्व स्नेही उपस्थित होते.उपस्थितांचे शाळेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.वानखेडे सर,तसेच दलित मित्र मोरसिंगजी नाईक,विष्णुभाऊ राठोड,भागचंद जाधव तसेच शा. व्य.स.सदस्य ,पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.भागवत सर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक श्री.प्रशांत वाघ सर यांनी केले.सादर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.भाऊसाहेब पाटील,परदेशी सर तसेच श्रीम.पवार मॅडम यांचे सहकार्य लाभले.प्रसंगी ग्रामस्थांकडून शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + 17 =