GM NEWS , यशश्वी आंदोलन वृत्त: वृक्षारोपणापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजविला पहूर येथील वाघुर नदीच्या पुलावरील जीवघेणा खड्डा . प्रवीण कुमावत यांच्या प्रयत्नांना आले यश . वाहनधारकांसह ग्रामस्थांनी केले समाधान व्यक्त .

0
437

पहूर ,ता . जामनेर दि . २० ( शंकर भामेरे ) :- जळगाव औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर पहुर येथील वाघुर नदीच्या पुलावर असलेला खड्डा वाढलेल्या रहदारीमुळे वारंवार दुरुस्त करूनही काही दिवसातच ‘जैसे थे ‘ होत होता . या खड्ड्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी यासाठी पहूर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुमावत यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस प्रशासनाला लेखी स्वरूपात निवेदन देऊन या खड्ड्यात वृक्षारोपण करणारअसल्याचे पत्र दिले होते .मात्र वृक्षारोपण करण्या पूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने मध्यरात्री जेसीबी यंत्राच्यासहाय्याने खड्ड्याची दुरुस्ती केली .यामुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे .

वाघुर नदीच्या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती . प्रसारमाध्यमांनी या विषयी वृत्तपत्रातून खड्डा दुरुस्तीची मागणी केली होती . खड्डा दुरुस्तही होत होता .मात्र पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने आठवडाभरातच खड्डा ‘जैसे थे ‘ होत होता . याविषयी प्रवीण कुमावत यांनी या खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा अभिनव उपक्रम राबवणार असल्याचे जाहीर करताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी निरजकुमार यांनी दखल घेत काल शनिवारी रात्री ११ वाजता त्या ठिकाणी JCB च्या साहाय्याने हा खड्डा पूर्ण खोदकाम करून मोठा ढापा तयार करून या ठिकाणी बसविण्यात आला. परंतु सदर ढापा एकाच बाजूने असल्याने धोकेदायक ठरू पाहत आहे . या विषयी नीरजकुमार यांनी सांगीतले कि ,त्या ढापाच्या बाजूने सुद्धा तेवढाच प्रमाणात क्राॅक्रीटचा पक्का माल टाकून तो पूर्ण पट्टा तयार करण्यात येणार आहे . ज्यामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे .प्रवीण कुमावत यांनी घेतलेल्या पुढाकाराने बद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.