GM NEWS, अभिनंदनीय वृत्त : पुरोगामी पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दै . जनशक्तीचे उप संपादक शरद भालेराव यांची निवड . पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक जळगाव येथे संपन्न . सर्वच स्तरातून होतंय कौतुकाचा वर्षाव .

0
102

जळगाव , दि . २० ( मिलींद लोखंडे ) : – पुरोगामी पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक जळगांव शहरातील मंगलम् लॉन येथे रविवारी, 13 सप्टेंबर रोजी नुकतीच घेण्यात आली . या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भुसावळचे
प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी होते. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक-अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या आदेशावरुन आणि महाराष्ट्र कोअर कमेटीचे अध्यक्ष विनोद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर महाराष्ट्राच्या पदांसह जळगाव जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदांवर पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी दै.‘जनशक्ति’चे उपसंपादक शरद भालेराव यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित सर्व पदाधिकार्‍यांसह शरद भालेराव यांचा कोरोना योध्दा म्हणूनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यापूर्वी त्यांनी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती.
उत्तर महाराष्ट्र संघटकपदी अमोल सोनार
महाराष्ट्र कोअर कमेटीच्या खजिनदारपदी साबीर बागवान तसेच उत्तर महाराष्ट्रासाठीच्या पदांसह जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकार्‍यांमध्ये उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शरद भालेराव, संघटक अमोल सोनार तर संपर्क प्रमुख म्हणून मनोज वाघ तर जळगाव शहराध्यक्ष निलेश भामरे, जिल्हा सहसचिव चंदन पाटील, जिल्हा खजिनदार सचिन इंगळे, जळगाव शहर संपर्क प्रमुख विलास सोनार, जिल्हा संघटक जयेंद्र मोरे, जिल्हा सहसंघटक जितेंद्र गायकवाड, सदस्य म्हणून महावीर पंडित तसेच भुसावळ तालुका सल्लागार म्हणून प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, तालुकाध्यक्ष कमलेश निकुंभ, बोदवड तालुका संपर्क प्रमुख निलेश शिंदे, अमळनेर तालुकाध्यक्ष लक्ष्मण सोनार आदी पदाधिकार्‍यांचा निवडीत समावेश आहे.
बैठकीत प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी, कमलेश निकुंभ, जयेंद्र मोरे, विलास सोनार, जितेंद्र गायकवाड यांनी मनोगत व्यक्त करुन मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विनोद पवार, सूत्रसंचालन शरद भालेराव तर आभार जिल्हा सचिव प्रशांत विसपुते यांनी मानले. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे .