GM NEWS , आशादायी वृत्त : कोवीड रुग्णांसाठी सरसावले मदतीचे हात . पहूर येथे ग्रामीण रुग्णालयास वॉटर गीझर , टीव्ही संच भेट .

0
173

पहूर , ता . जामनेर (शंकर भामेरे ) :-

जामनेर तालुक्यातील पहूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तभारतीय जनता पक्षाच्यावतीने ग्रामिण रूग्णालयास वॉटर गिझर व टिव्ही संच भेट देण्यात आला .
पहूर येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस पहूर भारतीय जनता पार्टीतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णांना गरम पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सरपंचपती रामेश्वर पाटील यांनी वाटर गिझर रूग्णालयास भेट दिले. तर रुग्णांच्या मनोरंजनासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन संजय देशमुख यांनी एलइडी टिव्ही संच भेट दिला व आपल्याला मिळणारे महिन्याचे मानधन रुग्णांच्या चहापानासाठी देऊ केले. यावेळी कोविड रूग्णांसाठी अहोरात्र सेवा देणारे कोविड योध्दा डॉ .जितेंद्र वानखेडे , डॉ .सिध्दांत घोलप तसेच आरोग्य कर्मचारी ,परिचारीका यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना योद्ध्यांना रोपे भेट देण्यात आली. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे , रेल्वे रेल्वे सेंट्रल बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शेतकी संघाचे संचालक साहेबराव देशमुख , अशोक पाटील , आर . बी . पाटील , समाधान पाटील , भाजपा शहर अध्यक्ष संदीप बेढे , योगेश भडांगे ,ग्रा. प .सदस्य प्रकाश पाटील,भारत पाटील, संतोष चिंचोले, विश्वनाथ वानखेडे , सलीम शेख , चांदा तडवी , राजू जाधव , ज्ञानेश्वर पवार , शांताराम गोंधनखेडे , सचिन कुमावत ,विजय मोरे, यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन चेतन रोकडे यांनी तर आभार भाजपाचे माजी शहराध्यक्ष शरद बेलपत्रे यांनी मानले.